Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

धुळे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमकी चौकशी केली तरी कशी ?



शिरपूर : माहे ऑक्टोबर मध्ये अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारक विक्रेता विरुद्ध एका मागोमाग एक बातमी वृत्तपत्र तरुण गर्जना मधून प्रकाशित झाल्यानंतर व त्याबाबतची लेखी तक्रार देखील परिवहन आयुक्ताकडे दिल्यानंतर त्यावर पत्र व्यवहार झाल्याने धुळे आरटीऒ विभागाचे अधिकारी यांनी सहाय्यक मोटार वहान निरीक्षक अमोल मालंजकर यांची नियुक्ती चौकशी अधिकारी म्हणून केली.मग या चौकशी अधिकारी यांनी नेमकी काय चौकशी केली.ते त्यांच्या चौकशी अहवाल मागणी करुन तो बघितल्यावरच कळेल.आरटीऒ साहेब काही अचानक भेट देण्यासाठी आलेले नव्हते.
याबाबतचा गवगवा येण्याच्या दोन-तीन दिवस आगोदरच शिरपूर तालुक्यात व शहरातील अनाधिकृत वाहन विक्रेत्याकडे करण्यात आलेला होता.व अनाधिकृत शोरुम मधील वहाने त्या दिवशी इतरत्र हालवण्यात आले.

आम्ही तर अनाधिकृत टू व्हीलर शोरुम धारकांच्या शोरुमच्या फ़ोटोसह नावेच आमच्या वृत्तपत्रातून कळविलेले असतांना केवळ एकच अनाधिकृत टू व्हीलर विक्रेता शोरुम कसे बरे दिसले ? ज्या शोरुम मध्ये 50-60 वहाने उभे असतात अशी शोरुम कसे काय दिसू शकले नाही ? अचानक भेट द्यायची होती,तर मग त्याचा गवगवा का केला ? आम्ही गावाचे नाव, शोरुमचे नाव व फ़ोटो हे सर्व दिलेले असतांना इतरांना अभय कसे ? लगता है 'दाल मे कुछ काला है शिरपूर शहरात व तालुक्यात बजाज सुप्रभात मोटार्स,श्री दत्त होंडा व हिरो विमलनाथ ऑटोमोबाइल्स, नरडाणा येथील बजाज निर्मला मोटर्स, सोनगीर येथील हिरो सदगुरु मोटर्स व प्रगती होंडा येथे वाहनांची विक्री करणाऱ्या ऑथोराइज्ड सर्विस सेंटर या नावाखाली वाहनांची खरेदी विक्री करून आपला गोरख धंदा सर्रास करतात यांच्यावर का कोणतीही कारही करण्यात आली नाही ? याचे उत्तर जनतेला आता परिवहन विभागाचे अधिकारी देतील का ? यांच्या शोरूम मध्ये उभे असलेली वाहने नेमके आलेत कुठून ? व कसे ? याचे उत्तर नेमकी आता कोण देणार ? या सर्व प्रश्नांची उत्तरे परिवहन विभागाच्या आर.टी.ओ.अधिकाऱ्या कडून आम्ही मिळवणारच तोपर्यंत तरी शांतता नाहीच.अधिकृत शोरुम धारकांकडे आलेली वहाने,विक्री झालेली वहाने व शोरुममधील व गोडाऊनमधिल शिल्लक वहाने याची तपासणी मागील पाच वर्षात या परिवहन विभागांच्या अधिका-यांनी कितीवेळा केली ? शिल्लम माल बरोबर होता का ? जर सर्व अधिकृत शोरुम धारकाचा शिल्लक माल बरोबर होता.तर या अनाधिकृत वहान विक्रेत्यांच्या शोरुमधील वहाने नेमकी कुठून आलीत ? ही वहाने चोरीचे आहेत का ? या वहानाची कोणत्या तरी पोलिस स्टेशनला तशी चोरीची नोंद आहे ? 

चोरीच्या वहानांची अधिकृत खरेदी विक्रीची नोंद परिवहन विभागाचे अधिकारी करतात का ? असे कितीतरी प्रश्न एकाच बाबीमुळे समोर येऊन उभे राहिले आहेत.या सर्व प्रश्नाची उत्तरे या परिवहन विभागांच्या अधिका-यांन कडून आम्ही घेतल्या शिवाय ना आम्ही ना हे अधिका-यांना आता शांतता नाहीच नाही.आखिर बकरे की माँ कब तक खैर मनाएगी. (वाचा सविस्तर पुढील अंकात...)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध