Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

आंबवली प्रभागातील देवघर केंद्र शाळेचा विद्यार्थी वेदांत विठ्ठल मोरे नासा इस्रो भेटीसाठी पात्र...!



तरुण गर्जना वृत्तपत्र:राजेश शिबे
 खेड तालुक्यातील दुर्गम अशा देवघर निवाचीवाडी केंद्र शाळेतील विद्यार्थी वेदांत विठ्ठल मोरे याने केंद्र स्तर प्रभाग स्तर व तालुकास्तर निवड चाचणी पार करून मंगळवार दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरी येथे झालेल्या अंतिम चाळणी परीक्षेमध्ये यश मिळवून नासा व इस्रो भेटीसाठी पात्र ठरला  रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या यादीत निवड झाल्याने वेदांत वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील १८ विद्यार्थी इस्रो भेटीसाठी व व ९ विद्यार्थी इस्रो व नासा पेटीसाठी पात्र ठरले आहेत. इस्रो व नासा भेटीसाठी पात्र ठरलेल्या 9 विद्यार्थ्यांमध्ये खेड तालुक्यातून वेदांत विठ्ठल मोरे याची निवड झाली आहे.वेदांत विठ्ठल मोरे याला देवघर निवाचीवाडी शाळेतील शिक्षिका विधी बने व मुख्याध्यापक मोहन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.आंबवली प्रभागाचे शिक्षण अधिकारी सखाराम मोहिते व केंद्रप्रमुख विनायक नलावडे यांनी शाळेला वेळोवेळी भेटी देऊन वेदांत व शिक्षकांना मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख विनायक नलावडे,आंबवली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सखाराम मोहिते,खेडचे गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण,गटविकास अधिकारी  आर.एम.दिघे यांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध