Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड...!जिल्हा भाजपाच्या ईतिहासात प्रथमच नंदुरबारला लाभले महामंत्री पद



नंदुरबार प्रतिनिधी –दिनांक 01 डिसेंबर 2022 रोजी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री विजयभाऊ चौधरी यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने सहमती दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी विजयभाऊ चौधरी यांची निवड केल्याची घोषणा एका भरगच्च पत्रकार परिषदेत केली.

नंदुरबार जिल्हा भाजपाच्या इतिहासात प्रथमच प्रदेश महामंत्रीपदासारखे उच्च महत्वाचे पद नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याला लाभले आहे. यामुळे जिल्हाभरातील कार्यकत्यांकडून विशेष जल्लोष केला जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध