Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १२ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने शैलेंद्र आजगे यांची पंचायतराज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक पदी नियुक्ती
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने शैलेंद्र आजगे यांची पंचायतराज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक पदी नियुक्ती
साक्री तालुक्यातील भाजप निष्ठावंत कार्यकते शैलेंद्र आजगे याना या संदर्भातील नियुक्तीपत्र प्रदेश संयोजक गणेश काका जगताप यांच्या वतीने त्यांना नुकतेच देण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी पक्षाकरिता शैलेंद्र आजगे यांनी विविध जबाबदाऱ्या घेऊन पक्ष संघटन वाढीसाठी अनेक वर्षे कार्य केले आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना पक्षाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांची ही निवड केली गेली आहे. शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजगे हे अथक परिश्रम करतील असा विश्वास पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक गणेश काका जगताप यांच्या कडून व्यक्त करण्यात आला आहे.
पंचायतराज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक पदी शैलेंद्र भगवान आजगे यांची स्तुत्य निवड झाल्याबद्दल माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ सुभाष भामरे, भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस दरबार सिंग गिरासे,यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा