Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

हॉर्टसॉप योजने अंतर्गत डाळिंब पिकाविषयी शेतीशाळेत मार्गदर्शन मौजे.पेरेजपुर ता.साक्री.येथे योजने अंतर्गत डाळींब पिकाविषयी शेतीशाळा घेण्यात आली.जे.बी.पगारे.यांचा कडून शेतकऱ्यांना डाळिंब पिकाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले



डाळिंब पिकासाठी जमीन हलकी ते मध्यम असावी .
डाळिंब पिकाच्या जाती - गणेश , मृदुला, फुले आरक्त ,भगवा ,फुले भगवा ,फुले भगवा सुपर या जातीचे रोपे खात्रीशीर शासनमान्य रोपवाटिकेतूनच खरेदी करावी. मातृवृक्ष बाग तेलगट डाग /मर रोगमुक्त असल्याची तसेच रोपवाटिका तपासणी तज्ञामार्फत झाली असल्याची खात्री करावी. डाळिंब लागवड 4.5*3.0 मीटर अंतरावर करावी त्यापेक्षा कमी अंतरावर डाळिंबाची लागवड करणे टाळावी कारण अशा बागेत तेल्या बरोबरच मर रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढते. रोप लागवडीनंतर साधारणपणे दोन वर्षाने पहिला बहार धरावा त्यापूर्वी बहार धरल्यास झाडे कमकुवत व अशक्त राहिल्याने रोगास लवकर बळी पडतात. खोडकिडीचा जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या क्षेत्रामध्ये डाळिंबाला हलक्या जमिनीत चार खोडे ठेवून वळण देणे योग्य ठरते. डाळिंबामध्ये दर्जेदार फळाचे उत्पादन घेण्यासाठी बहार व्यवस्थापन करताना पानगळ झाल्यानंतर बाहेरील फांद्याची शेंड्यापासून वीस सेंटीमीटर अंतरावर छाटणी सह मध्यवर्ती भागात भरपूर सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी आतील फांद्याची विरळणी करण्याची शिफारस आहे. वर्षातून एकच भार धरावा बहार धरल्यानंतर झाडाच्या आकारमानानुसार फळे ठेवावीत त्यामुळे फळाचा आकार वाढून दर्जेदार फळ उत्पादन शक्य होते. नैसर्गिक पानगळ झाली नसल्यास पानगळ करण्यासाठी बहार धरण्यापूर्वी २० दिवस अगोदर इत्रेल या संजीवकाची २ मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे .खते झाडाच्या घेऱ्याजवळ कोली करून किंवा ड्रीपच्या खाली टाकून मातीने झाकावीत. खोडाला लहान छिद्र पाडणारे भुंगेरे (शॉट हॉल बोरर) याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १लिटर पाण्यात 400 ग्रॅम गेरू रात्रभर भिजवून ,खोडास दोन ते अडीच फुटापर्यंत पेस्टिंग करावी .रोगट फळे ,पाने व फांद्या बागेपासून दूरवर जाऊन नष्ट करावेत. बहार धरतेवेळी शेणखत व निंबोळी पेंड ३ किलो प्रति झाड एकत्र मिसळून रिंग पद्धतीने झाडाभोवती द्यावे तसेच डाळिंबाच्या झाडाभोवती झेंडूची लागवड केल्यास सूत्र कृमेचा प्रादुर्भाव कमी होतो.
शेती शाळेला श्री. जे. बी. पगारे कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या शेती शाळेला शिवाजी देवराव मराठे,प्रल्हाद आनंदा सोनवणे, अनिल भाऊसिंग शेवाळे, गोकुळ नारायण देवरे, दशरथ नागो शेवाळे ,यादव सोनवणे, भाऊसाहेब पोपट देवरे, दिलीप आत्माराम शेवाळे ,राजेंद्र भटू शेवाळे, सरपंच श्री मनोज भास्करराव देसले. आश्या प्रकारे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.
या शेती शाळेला श्री. एस. बी. शिंदे मंडळ कृषी अधिकारी साक्री व तालुका कृषी अधिकारी श्री.सी.के.ठाकरे यानी मार्गदर्शन केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध