Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

शिरपूर शहरात खुनाचे गुन्हयातील फरार आरोपीस अवघ्या एक तासात आरोपी जेरबंद करण्यात शहर पोलीसांना यश...!



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात खुनाचे गुन्हयातील फरार आरोपीस अवघ्या एक तासात आरोपी जेरबंद करण्यात यश आले आहे.
दि. १० / ०१ / २०२३ रोजी रात्री ८.३० वाजेचे सुमारास ईदगाह नगर शिरपुर जि. धुळे भागात सार्वजनिक शौचालय जवळील रस्त्यालगत लघुशंका करण्याचे कारणावरुन रामभाऊ भगवान माळी रा.मराठा गल्ली शिरपुर जि.धुळे यास मनोज भगवान मराठे रा ईदगाह नगर शिरपुर जि.धुळे याने मारहाण करुन त्यास सिमेंट काँक्रेट रस्त्यावर जोराने आपटुन त्यास जिवे ठार मारले बाबत मिळालेल्या माहितीवरुन शिरपुर शहर पो.स्टे.चे पो.नि.ए.एस.आगरकर यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपासचक्रे वेगाने फिरवुन शोध पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे सोबत मारेकरी मनोज भगवान मराठे याचा शोध घेत असतांना त्यास अवघ्या १ तासात वाघाडी फाट्याजवळ शिताफीने ताब्यात घेवुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

सदर घटनेबाबत मयताचे मेहुणे-ज्ञानेश्वर बळीराम रोकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी- मनोज भगवान मराठे याचेविरुध्द शिरपूर शहर पो.स्टे. गु.र.नं. ०६ / २०२२ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल होवुन सदर गुन्हयात वरनमुद आरोपीतास अटक करुन त्यास मा.न्यायालयात हजर केले असता त्याची दि.१२ / ०१/ २०२३ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि.आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि / किरण वाहे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.ए.एस.आगरकर, पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे.चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर,
पोउनि किरण बान्हे,गणेश कुटे, संदीप मुरकुटे तसेच शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील,लादूराम चौधरी,पोना/मनोज पाटील,हेमंत पाटील,पोकों/ गोविंद कोळी,विनोद अखडमल, प्रविण गोसावी, मुकेश पावरा,प्रशांत पवार,मनोज दाभाडे, उमाकांत वाघ व भूषण कोळी अशांनी मिळून केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध