Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २० जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
चोपडा ग्रामीण पोलीसाची धडक कारवाई...! यावल पोस्टे हद्दीतील ज्वेलर्स शॉपीवर दरोड्यातील फरार सराईत आरोपी यास अवैध धारदार तलवारीसह केले जेरबंद...!
चोपडा ग्रामीण पोलीसाची धडक कारवाई...! यावल पोस्टे हद्दीतील ज्वेलर्स शॉपीवर दरोड्यातील फरार सराईत आरोपी यास अवैध धारदार तलवारीसह केले जेरबंद...!
सविस्तर वृत्त असे की,आरोपी नामे सुनिल अमरसीग बारेला रा गौ-यापाडा ता चोपडा याचेवर जळगांव जिल्हाभर 10 गुन्हे दाखल असुन तो यावल पोस्टे येथे दि.07/07/2021 रोजी नमुद आरोपी याने इतर आरोपी सोबत पिस्टलचा धाक दाखवुन दागीने रोख रक्कम असे 1126675/रुपये किमतीचा ऐवज जबरी चोरी करुन सुमारे दिड वर्षापासुन तो फरार होता तरी नमुद आरोपी पकडण्या बाबत मा.पोलीस अधिक्षक श्री एम. राजकुमार सो जळगांव मा.अपर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे सो चाळीसगांव परिमंडळ मा.सहा.पोलीस अधिक्षक श्री कृषीकेश रावले सो चोपडा भाग चोपडा यानी वेळोवेळी त्यास पकडने करीता सुचना दिलेल्या होत्या.त्यावरुन दि.19/01/2023 चे रात्री तोच आरोपी हा दारधार तलवारसह सत्रासेन शिवारात तिन फाट्यावजळ जुना उमर्टी रस्त्यावर संशायस्पद वावरत आहे.
अशी गुप्त बातमी सपोनी संदिप दुनगहु यांना मिळाल्याने सदर ठिकाणी जावून खात्री करुन कायदेशीर कारवाई करा असा आदेश दिल्याने पोहेकॉ / 350 लक्ष्मण शिंगाणे यांनी तत्काळ दोन पंचाना बोलावुन घटनेची हकीगत सांगुन पंच व सफौ/ 93 किशोर शिंदे,पोहेकॉ / 1855 संजय येदे,असे खाजगी वाहणाने रवाना होवुन बातमी प्रमाणे सदर ठिकाणी जावुन थोडा वेळ दुरुनच खात्री केली तेव्हा तेथे एक इसम सत्रासेन गावाचे तिन फाट्याजवळ जुना उमर्टी रस्त्यावर संशयीत रित्या तलवार घेवून फिरत असतांना दिसला त्याचे हातात तलवार असल्याने बातमी प्रमाणे खात्री झाल्याने रात्री 01.30 वाजता त्यास जागीच पकडुन हातातील तलवार हिसकावुन दोन पंचाकरवी जप्त करण्यात आली व त्याचे नाव गाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल अमरसीग बारेला वय 28 वर्षे रा गौ-यापाडा ता चोपडा असे सांगीतल्याने त्यास त्याचे कडे मिळुन आलेल्या मुद्देमालास ताब्यात घेवुन चोपडा ग्रामीण पो,स्टेला आणुन सदर बाबत अधिक चौकशीत नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न होवुन त्याचेवर संपुर्ण जळगांव जिल्ह्यात चोरी,घरफोडी,जबरी चोरी सारखे 10 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून जळगाव तालुका पोस्टे,यावल पो,स्टे,एम आय डी सी पोस्टे जळगांव कार्यक्षेत्रात गुन्हे करुन यावल पोस्टे येथे दि. 07/07/2021 रोजी नमुद आरोपी याने इतर आरोपी सोबत पिस्टलचा धाक दाखवुन दागीने रोख रक्कम असे 1126675/रुपये किमतीचा ऐवज जबरी चोरी करुन त्या दिवसा पासुन तो फरार होता तरी नमुद आरोपी याचेवर चोपडा ग्रामीण पोस्टेला पोहेकॉ / 2438 राकेश तानकु पाटील यांचे फिर्यादीवरुन सीसीटीएनएस गुरन07/2023 आर्म अक्ट कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करुन सदरची कारवाई हि मा.पोलीस अधिक्षक श्री एम.राजकुमार सो जळगांव मा.अपर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे सो चाळीसगांव परिमंडळ मा.सहा.पोलीस अधिक्षक श्री कृषीकेश रावले सो चोपडा भाग चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही स.पो.नि.संदीप दुनगहु, पो उप निरी अमरसीग वसावे, सफौ / 93 किशोर शिंदे,पो.हे.कॉ. 1855 संजय येदे,पोहेकॉ / 350 लक्ष्मण शिगाणे.पोहेकॉ / 2793 शिवाजी बाविस्कर,
पोकॉ / 3139 प्रमोद पारधी, पोकॉ/ 353 किशोर माळी सर्व नेमणुक चोपडा ग्रामीण पो.स्टे.
यांनी कारवाई करण्यास मदत केली असुन पुढील तपास पोहेकॉ / 350 लक्ष्मण शिगाणे करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा