Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

सनराईज स्कूल मध्ये बाल आनंद मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम साजरा...

परंडा (राहूल शिंदे)दि.२० तालुक्यातील शेळगाव येथील सनराईज इंग्लिश स्कूल या प्रशालेमध्ये बाल आनंद मेळावा व मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप तसेच हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.

बाल आनंद मेळावा या कार्यक्रमाचे उद्घघाटन तांदूळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख महामुनी सर व केंद्रीय मुख्याध्यापक तुळशीराम भोसले तसेच मुख्याध्यापक संभाजी देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय शेवाळे,पिंटू दैन,कैलास दैन,गणेश वाघमारे,डॉ.दिलीप उदागे,बालाजी शिंदे,रवींद्र गाढवे,चंद्रकांत गाढवे,रवी बिरंगळ,नितीन मोहिते हे प्रमुख पाहुणे लाभले.

या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक संभाजी देवकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रकाश शिंदे यांनी तर आभार राहुल शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व साहित्याचे विविध स्टॉल लावले होते.त्यामध्ये खाऊ गल्ली' स्टेशनरी भाजीपाला, जीवन उपयोगी साहित्य असे स्टॉल लावलेले होते. या आनंद मेळाव्यासाठी सर्व माता पिता पालक उपस्थित होते.बाल आनंद मेळाव्यासाठी शिक्षक बाळासाहेब जामदारे व गणेश खरसडे यांनी मार्गदर्शन केले. 

तसेच मकर संक्रांतीनिमित्त महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशालेतील सर्व माता पालक आमंत्रित करून  माता पालकांचा मकर संक्रांति निमित्त भव्य असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्व माता पालक यांनी सहभाग घेतला.हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सुरेखा शेळके, सुरेखा चौधरी, निकिता चोपडे ,कीर्ती गांगर्डे यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध