Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी...!
नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी...!
नंदुरबार-नागपूर येथील झिरो माईलची जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,नागपूर शहरातील झिरो माईल परिसरात विदर्भ विभागीय मच्छीमार संघाने शासनाने जागेची ठरविलेली किंमत रु.२९,७१५/- रक्कमेने भूमी अभिलेख कार्यालयात दि.११ नोव्हेंबर १९७४ रोजी भरुन बांधकाम मंजुरीने इमारत बांधली होती. पण हेरीटेज वॉक आणि मेट्रोसाठी सदरची जागा आवश्यक आहे, असे निमित्त दर्शवित तत्कालिन जिल्हाधिकारी मार्फत दि.२७ डिसेंबर २०१७ रोजी प्रशासनाने ताब्यात घेतली आणि जागेवरील इमारत जमीनदोस्त केली. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात मे.उच्च न्यायालयाने ८५५४ चौ.फुट जागा सोडून उर्वरित जमीन प्रशासनाने विकास कार्यासाठी घ्यावी, असा आदेश दिला असतांना देखील प्रशासनाने इमारत जमीनदोस्त केली. उल्लेखित जागा महानगरातील महत्त्वाच्या स्थळी आहे म्हणून या संदर्भात अनेकांची मागणी आहे.
सर्व अभ्यासाअंती मे.उच्च न्यायालयाने हेरीटेज वॉक प्रकल्पच रद्द केला आहे. मात्र तिकडे इमारत या निर्णयापूर्वीच तोडली गेल्याने मच्छीमार भोई समाजावर अन्याय झाला आहे.म्हणून सदरची जागा पूर्ववत विदर्भ मच्छीमार भोई समाजास, त्या जागेवर ज्या संस्थेचा हक्क आणि अधिकार आहे, अशा संस्थेस देण्यात यावी,असे निवेदनात म्हटले आहे, निवेदन देतेप्रसंगी नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाचे प्रभारी अध्यक्ष चंद्रकांत खेडकर, उपाध्यक्ष इंजि.रामकृष्ण मोरे, सदस्य अँड.प्रकाश भोई,डॉ.गणेश ढोले, राजेंद्र भोई, संजय साठे,जितेंद्र खेडकर, सुरेश वाडीले,प्रताप सोनवणे आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा