Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

मुंबई सेंट्रल-भुसावल एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीत सवारी खा. डॉ. भामरे, आ. जयकुमार यांचे रेल्वेस्थानकांवर स्वागत



दोंडाईचा : खान्देशातुन पश्‍चिम रेल्वेने मुंबई जाणार्‍या खानदेश एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर ही रेल्वे दररोज व्हावी अशी मागणी सातत्याने होत होती त्यासाठी माजीमंत्री आ. जयकुमार रावल, खा.डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री ना. अश्‍विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे सातत्याने केली होती. शिवाय शिरपूर येथील धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी हि यासंदर्भात रेल्वेमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांची जालना येथे (दि.१२ नोव्हेंबर) रोजी भेट घेवुन निवेदन देवुन मागणी केली होती. खान्देश एक्सप्रेस दररोज करण्यास तांत्रिक अडचण निर्माण होत होती. त्यावर उपाय म्हणून मुंबई सेंट्रलहुन तीन दिवस रेल्वे सुरू करण्यात आली. त्या रेल्वेच्या पहिल्याच दिवशी मुंबईहुन आ. रावल, खा. भामरे हे स्वतः प्रवास करून त्या रेल्वेने आले. दोंडाईचा, शिंदखेडा व नरडाणा या स्थानकांवर मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत करण्यात आले. (दि.११जानेवारी) रोजी सकाळी ९ वाजता दोंडाईचा रेल्वे स्थानकात रेल्वे आल्यानंतर धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिंदखेडा पंस सभापती भारत ईशी, दोंडाईचा भाजपा शहराध्यक्ष प्रवीण महाजन, नपा माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, जितेंद्र गिरासे, माजी नगरसेवक नरेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर, किसन दोधेजा, शेख मॅडम, विरेंद्र गिरासे, राकेश अग्रवाल, अनिल सिसोदिया, कृष्णा नगराळे, प्रमोद चौधरी, शिरपूरचे नंदु माळी, शिंदखेडा रेल्वेस्थानकावर नगराध्यक्षा सौ. रजनी अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, भिला माळी, भाजप शहराध्यक्ष प्रवीण माळी, सुभाष माळी, युवराज माळी,  नगरसेवक मनोहर पाटील, विनोद पाटील, सुरज देसले, दादा मराठे, पंस सदस्य प्रकाश बोरसे, उपसरपंच समाधान बोरसे, उमेश गिरासे, आर एच भामरे तर नरडाणा येथे जि.प. महिला बालकल्याण सभापती सौ. संजीवनी सिसोदे, माजी कृषी सभापती संग्राम पाटील, जि प सदस्य पंकज कदम, धनंजय मंगळे, डी आर पाटील, विरेंद्र गिरासे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. आर जी खैरनार, नथ्थु वारुळे, किशोर रंगराव पाटील, माजी उपसभापती राजेश बोरसे, पंस सदस्य प्रवीण मोरे, पाष्टे सरपंच मोतीलाल वाकडे, माजी जि प सदस्य जितेंद्र सिसोदे, कृऊबा संचालक सखाराम पाटील, डॉ. नितीन चौधरी, सिध्दार्थ संजय सिसोदे, माजी उपसरपंच अनिल सिसोदे, आर ओ पाटील, बेटावद माजी सरपंच विरेंद्र पवार, महेंद्र माळी, वाघोदे सरपंच वाघ गुरुजी, वायपुर सरपंच दत्तू पाटील, वारुड माजी सरपंच दत्तू दोरिक, रविंद्र वाघ, अजंदे सरपंच ईश्‍वर परदेशी, उपसरपंच जितेंद्र भामरे, विटाई सरपंच लिलाधर खैरनार, हिरालाल बोरसे, भटु बोरसे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी खा. डॉ. भामरे, आ. रावल यांचे जोरदार स्वागत केले. (दि. ११ जानेवारी) रोजी सकाळी ९ वाजता दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर गाडीचे आगमन झाल्यावर दोंडाईचा शहर भाजप, व्यापारी, रेल्वे संघर्ष समिती, नगरसेवक यांनी खासदार, आमदार द्वायीचे स्वागत जोरदार स्वागत करण्यात आले. शिंदखेडा रेल्वे स्टेशन रांगोळ्यांनी सजविले होते. त्यांनतर नरडाणा येथे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, आजूबाजूच्या गावांचे सरपंच आदींनी दोन्ही मान्यवरांचे स्वागत करून जल्लोष केला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध