Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

गुहागर प्रतिष्ठान आयोजित माघी गणेशोत्सव आणि महा रक्तदान शिबीर संपन्न...!



अक्षय कदम:यावर्षी प्रथमच विरार शहर मनवेलपाडा नाना नानी पार्क मध्ये प्रथमच गुहागरचा महाराजा या नावाने सार्वजनिक माघी गणेश उत्सव गुहागर प्रतिष्ठान (रजि.)च्या वतीने आयोजन करण्यात आला होता.मंडळातील सर्व कार्यकर्ते सर्व सभासद यांनी गणपती येण्यापूर्वी मंडपातील सजावट आणि गणपतीच्या आगमनापासून खूप मेहनत घेतली होती.दोन दिवस गणपतीच्या मंडपामध्ये दिवस- रात्र सर्व कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने केले होते.


भव्य दिव्य असा हा कार्यक्रम दिनांक 25/1/2023 रोजी गुहागरच्या महाराज्याची स्थापना करण्यात आली होती.११ वाजता सत्यनारायणाची महापूजा दुपारी १ वाजता महाप्रसाद,संध्याकाळी ८ वाजता राजहंस नमन मंडळ वरवेली राजाणेवाडी गट नं १ यांचे नमन.नमन पाहण्यासाठी गुहागर तालुक्यातील रहिवाशांनी मोठी गर्दी केली.दिनांक २६/१/२०२३ रोजी महारक्दान शिबिर आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ६८ रक्तदात्यानी रक्तदान केले.सर्व कार्यकर्ते आपल्या पद्धतीने सेवा बजावत होते.गुहागर प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक श्री योगेश( दादा) कदम आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व कमिटी सभासद आणि महिला मंडळ व हितचिंतक या वेळी उपस्थित होते.विभागातील व गुहागर तालुक्यातील रहिवाशांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.सार्वजनिक माघीगणेश उत्सव सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.आपण सर्वांनी यापुढे अशाच पद्धतीने काम करत राहावे आणि गुहागर प्रतिष्ठानचे नाव पुढे उज्वल व्हावे हीच गुहागरच्या महाराज्यांच्या चरणी प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध