Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० जानेवारी, २०२३
शेकडो चित्रे रेखाटून बालकांची वंदनीय बाळासाहेबांना अनोखी आदरांजली...!
मुंबई प्रतिनिधी: महेश कदम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वडाळा विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्या मार्फत वडाळा विधानसभा शाखा क्रमांक २०१, २०८ मधील शालेय विद्यार्थांकरीता या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी होते त्यांनी रंग रेषांद्वारे शेकडो चित्रे रेखाटून बाळासाहेबांना अनोखी आदरांजली अर्पण केली.स्पर्धेतील मुला मुलींना ड्राॅइंग पेपर विविध प्रकारचे रंग पेन्सिल देण्यात आले होते.
यानंतर या चिमुकल्यांनी ड्राॅइंग पेपरवर अत्यंत आकर्षक अशी निसर्ग चित्रे व्यक्तिचित्रे रेखाटली.यात काही मुलांनी बाळासाहेब ठाकरे हे माईक समोर उभे राहून भाषण करतायेत हे रूप दाखवले. काही मुलांनी रस्त्यावर बसलेले फेरीवाले, टॅक्सीवाला, रिक्षावाला, नळावरील पाणी वाहून नेणारी महिला,उद्यानातील झाडेझुडपे, फुलझाडे, धावणाऱ्या बेस्ट बसेस, लोकल याचीही चित्रे मुलांनी रेखाटून आपल्यातील उत्तम कलेचा आविष्कार घडविला.स्पर्धेतील विजेते विद्यार्थी व विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी वडाळा विधानसभा संघटक राकेश देशमुख,शाखाप्रमुख हमीद शेख,शाखा संघटिका सरीता मांजरे, शाखा समन्वयक विशाल जाधव, युवाशाखा अधिकारी स्वप्निल केळशीकर,चिनुभाई, मोहम्मद हुसैन, शफी शेख,स्मिता वाडेकर,श्रध्दा तांबे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा