Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा...!



मुंबई प्रतिनिधी: महेश कदम 
"आरंभ प्रतिष्ठान" च्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभादेवी/दादर/महिम विभागातील पुरातन मंदिरांचे वर्षानुवर्षे देवाची भक्ती,सेवा, पूजाअर्चा करून देवस्थान जागृत ठेवण्यासाठी मनोभावे सेवा करणारे ट्रस्टी व सेवेकरी यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ, मानाची शाल,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.कार्यसम्राट आमदार श्री.कालिदास कोळंबकर साहेब,स्थानिक आमदार श्री.सदा सरवणकर,माझी नगरसेवक श्री.नाना आंबोले,भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष श्री.नरेंद्र गावकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध मंडळ आणि संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्तेचा सहभाग वाखण्याजोग होता. 

तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख आयोजक संस्थेचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत धावले,श्री.इंद्रजित तिवारी, श्री.विकास माने,श्री.जितेंद्र कांबळे, श्री.चारुहास हंबीरे,श्री.जयवंत पवार, श्री.विकेश जैन,श्री.ओमकार गुरव, श्री.जितेंद्र गुप्ता,श्री.दादा शिरसेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध