Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
ऑनलाईन शक्ती तुरा गीत गायन स्पर्धेत कवी/शाहीर तुषार पंदेरे प्रथम क्रमांकाने विजयी
ऑनलाईन शक्ती तुरा गीत गायन स्पर्धेत कवी/शाहीर तुषार पंदेरे प्रथम क्रमांकाने विजयी
तरुण गर्जना वृत्तपत्र (अक्षय कदम)-
अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ प्रस्तुत कुणबी युवक आयोजित online शक्ती तुरा गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आपली निवड झाल्यावर सर्वांचे आभार मानले आहेत असे म्हंटले आहे की याचं श्रेय जातं ते प्रथम ज्यांनी या लोककला शाहिरी हे ज्ञान दिले ते म्हणजे गुरुवर्य शाहीर शंकर पंदेरे, शिवराम पंदेरे, तुकाराम पंदेरे,आणि वस्ताद लोकशाहीर मधुकर पंदेरे बाबा आणि या माझ्या पंदेरे परिवाराला शाहिरी काव्य लेखणीचा वसा ज्यांच्या मुळे लाभला ते आपले आदर स्थान
शीघ्र कवी वासुवाणी मुंगळे यांच्या आशीर्वादाने शक्य झाले तसेच मी 30 वर्ष या लोककलेचा पाईक शाहीर म्हणून कार्यरत आहे.
पणं शक्ती तुरा शाहिरी स्पर्धेत कधी भाग घेतला नाही व तशी संधी आली न्हवती, पणं या स्पर्धेत भाग घेतला या साठी मोठी साथ लाभली ते म्हणजे ज्यांनी या शक्ती तुरा शाहिरी मध्ये नावारूपाला आणले ते शाहीर झराजी वीर व कळझोंडी ग्रामस्थ व माझा भाऊ समान उत्कृष्ट ढोलकी पटु सुरेश वीर आणि कीबोर्ड मास्टर सतिश मोहिते यानी या गाण्याना उत्तम संगीत साथ दिली, तसेच कोरस ला जुने साथीदार श्याम वीर आणि शिष्य गायक संदेश पाते आणि इतर सहकारी यांचे मुळे हा प्रथम क्रमांक पटकावला अशीच साथ राहो रंगदेवते चरणी प्रार्थना आपला शाहीर तुषार मधुकर पंदेरे आभार मानत धन्यवाद दिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा