Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ जानेवारी, २०२३
रेशनिंग मालाचा खरा माफ़िया तस्कर पोलिसांच्या वरदहस्तांने अजूनही गुलदत्यात...?
रेशन गोडाऊनवर एकाच पदावर पाच ते सहा वर्ष काम करणा-यावर नेमका.... कुणाचा ?
शिरपूर प्रतिनिधी: सध्या रेशन मालाची तस्करी हा अख्या महाराष्ट्रातील एैरणीवरचा विषय बनलेला आहे. स्थानिक अधिकारी व पांढरपेशीच्या वरदहस्ताने गोडाऊन किपर व तेथील कारकून हे वर्षानुवर्ष एकाच जागेवर नोकरी करतांना दिसतात.यांची बदलीच होत नाही. ही एक लाजीरवानी बाब आहे.व असे व्यक्ती जेव्हा कामावर रुजू होतात, त्यावेळेस त्याच्या जवळ राहण्या इतपतच घर असते,मात्र त्यानंतर रेशन गोडाऊन रुजू झाल्यानंतर त्याच्या जवळ आलिशान बंगला काय ? चार चाकी वाहन काय ? व बँक बॅलन्स काय ? अशी किती तरी मोहमाया त्यांनी जमा केलेली दिसून येते.खरे तर यांची व यांनी जमा केलेल्या मोहमायेची ई.डी.मार्फ़त चौकशीच हॊणे गरजेचे आहे.
शासन नियमानुसार प्रती धान्याचे पोते हे 50.5 किलो असायला हावे,परंतु ते पोते हे 48 किलो ते 49 किलो एवढेच येत असते.असे का होते ? हे कर्मचारी रेशन दुकानावर पोहचणारे धान्यांच्या पोत्यातून 1 ते 2 किलो धान्य प्रति पोत्या मधुन चोरी करतात.अश्या प्रकारे संपुर्ण तालुक्यात पुरविला जाणा-या मालातून किती तरी धान्य चोरुन जमा केले जाते.व हे धान्य चोरट्या मार्गाने तस्करी केली जाते.अश्याच प्रकारे शिरपूर तालुक्यातील....हा अधिकारी 5 ते 6 वर्षापासून एकाच पदावर रेशन मालाच्या गोडाऊनवर काम करीत आहे. प्राप्त माहिती नुसार त्याची बदली झाली असता.....अधिका-याने....च्या बळावर बदली रोखली याबाबतची माहिती आम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त झालेली आहे. त्यामुळे ही....ची....
घेणारा अधिकारी नेमका कोणता ? त्याचा देखील शोध घेणे आवश्यक आहे.व अश्या अधिकारी व कर्मचा-याच्या ख-या कुंडल्या बाहेर काढण्यासाठी योग्य अश्या ब्राम्हणाची गरज असल्याचे तालुकावाशीयाचे मत आहे.
शिरपूर तालुका बहुल आदिवासी वस्तीचा तालुका आहे.त्यामुळे त्याच्या अज्ञाचा गैरफ़ायदा घेऊन मालाचा झोल करण्यास अश्या अधिकारी व कर्मचा-याना अजूनच वाव मिळतो.मात्र आता तालुक्यातील काही गावांतील अदिवासी बांधव शिक्षीत झाल्याने त्यांना या मालातील झोल समजू लागलेला आहे.याचाच एक प्रकार म्हणजे शिरपूर तलुक्यात 3 डिसेंबर रोजी मालकातर गावातील रहिवाश्यांनीच रेशनचे धान्य काळ्या बाजारात नेणारे तीन ट्रक पकडले मात्र सुध्न व कर्तव्य दक्ष अश्या पोलिस प्रशासनामुळे त्यातले दोन पळून जाण्यात सफ़ल झाले.म्हणुनच तर पोलिस दलाने "सदरक्षणाय खलनिग्रहणाय"असे ब्रिद वाक्य हे अश्या कर्तव्य दक्ष पोलिस अधिका-यांच्या भुषावह ग्रहण केलेले आहे.असे म्हणने वावगे ठरणार नाही.खरे तर या ब्रिद वाक्याचा अर्थच या अधिका-यांना समजला कि नाही यात शंका निर्माण करणारा आहे,"सत्याचे रक्षण आणि दुर्जनाचा नाश"असा अर्थ या ब्रीद वाक्याचा आहे.मात्र येथे नमके तसे घडलेले नाही.ग्रामस्थांनी पकडलेला रेशनचा मालाबाबत मुख्य तस्करास व त्यांच्या इतर साथीदारास वाचविण्यासाठी थातूरमातूर गुन्हा दाखल झाला.पुरवठा निरीक्षकांनी अतिशय सुंदर अशी संदिग्ध तक्रार दिली.त्याचा आधार घेत पोलीस तपास अधिकारी अतिशय चांगल्या पध्दतीने वेळकाढूपणा करुन करीत आहे.
त्यामुळेच या घटनेला आता एक महिना उलटून गेला. तरी देखील रेशनिंग मालाचा खरा माफ़िया तस्कर....
पोलिसांच्या वरदहस्तांने अजूनही गुलदत्यात आहे.ना संशयित ट्रक सापडले,ना संशयित आरोपी.यामागचे गौडबंगाल आहे तरी काय ? रेशन मालाचा खरा तस्कर कोण ? मालकातर प्रकरणातील ब्लॅक मार्केटचा खरा सूत्रधार कोण ? हे सर्व माहिती असून देखील तपास मात्र शून्य.पोलिस प्रशासनाच्या या नाकर्तापणे मुळे परिसरातील नागरीक खिन्न झालेले आहेत.व याबाबत या अधिका-याची तक्रार मुख्यमंत्री मोहदय व गृहमंत्री मोहदय यांच्याकडे व्हावी तसेच येथिल स्थानिक प्रशासन व पुरवाठा विभागाचे अधिकारी याबाबत जे मुग गिळुन गप्प बसलेत याची बंद बोलती खोलण्यासाठी शासनाच्या अन्न व पुरवठा विभागला देखील तक्रार केल्यास रेशन गोडाऊन मधील चोरट्यांना व धान्य तस्करीचा माफ़ियास जेरबंद करण्यास मदत होईल.असे ग्रामस्थांनी त्यांचे मत आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले आहे.
अता तरी आपल्या कर्तव्याची जान ठेवून सर्व सामान्य जनतेच्या खिश्यातून कर रुपाने शासनाने वसुल केलेल्या पैश्यातून मिळणा-या पगार व इतर भत्यांची आण ठेवून त्याच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावित व गुलदस्त्यातील मुख्य सुत्रधार जेरबंद करावे असे नागरिकांनी आमच्या प्रतीनिधीकडे मागणी आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा