Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ जानेवारी, २०२३

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हातेड शिवारात ९ गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चोपडा ग्रामीण पोलीसाची धडक कारवाई....!



चोपडा प्रतिनिधी: हातेड बु गावचे शिवारात शिरपूर ते चोपडा रोडवर हातेड गावाचे पुढे दोन कि मी अंतरावर युग पेट्रोलपंपा जवळपास महिंद्रा बोलेरो पिकअप क्रं. MP-०८-GA२०४९ हिचे वरील चालक व क्लिनर नाव गाव माहिती नाही यांनी संगनमताने त्यांचे ताब्यातील वाहनात १,३५,०००/- रू किंमतीचे ९ गो-हे हे त्यांचे चौघे पाय त्यांना वेदना होतील अशा रितीने जखडून बांधून गाडीत दाटीवाटीने पालथे टाकून त्यांची विना परवाना अवैधरित्या कत्तल करण्याची उद्देशाने वाहतुक करताना मिळून आले असून गाडीवरील चालक व क्लिनर यांनी वाहन थांबताच वाहनातुन उड्या मारून शेत शिवारात अंधारात पळून गेले आहे म्हणून वगैरे मजकूराचे फिर्याद वरून गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोना/९४९ किरण पाटील हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध