Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

शेणपूर गावात अत्यंत रहदारीच्या ठिकाणी धाडसी घरपोडी सुमारे 10 ते 12 लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास...



साक्री प्रतिनिधी:काल दिनांक 23/2/ 2023 रोजी मध्यरात्री मौजे शेणपूर येथे गावाच्या मध्यभागी म्हणजेच रहदारीचा ठिकाणी श्री संजय उत्तम काकुस्ते रा.शेणपूर ता. साक्री जि.धुळे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. गेल्या दोन दिवसापासून श्री संजय काकुस्ते हे गावी गेले होते आज सकाळी दहा वाजेला त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले.त्यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटीतून लॉकर तोडून सुमारे 18 तोळे सोने व आठ ते दहा हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्या असल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे. 

आजच्या सोन्याच्या बाजार भावानुसार तब्बल दहा ते बारा लाखाचा हा ऐवज असल्याचे समजते ग्रामीण भागातील शेणपूर गावात अंत्यत रहदारीच्या ठिकाणी ही मोठी चोरी पहिल्यांदाच झाली आहे. श्री संजय उत्तम काकुस्ते यांच्या फिर्यादी नुसार 18 तोळे सोने व आठ ते दहा हजाराची रोकड असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे. 

साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.रवींद्र देशमुख साहेब यांच्या अधिपत्याखाली पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव तसेच शेणपूरचे पोलीस पाटील हेमराज काळे यांच्या मदतीने तपासाला वेग देऊन लवकरात लवकर चोरट्यांचा छडा लावला जाईल असे प्रतिपादन श्री देशमुख साहेब यांच्याकडून करण्यात आले यावेळी धुळे जिल्हा मोबाईल स्कॉड पथक  देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडील श्वान पथकाचा वापर करून चोरट्यांचा मार्ग निश्चित करण्यात आला व घरातील सर्व वस्तूंचे, हातांच्या ठशांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत यामुळे तपासाला मोठी मदत त्यांच्यामार्फत निश्चित होणार असे गावातील नागरिकांकडून व पोलीस प्रशासनाकडून बोलले जात आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध