Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील छाईल गावात गावकऱ्यांनी ग्रामसभेतच प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र नाराजगी जाहीर करत निषेध नोंदवला
साक्री तालुक्यातील छाईल गावात गावकऱ्यांनी ग्रामसभेतच प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र नाराजगी जाहीर करत निषेध नोंदवला
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या छाईल गावात ग्रामसभा चांगलीच गाजली... नागरिकांनी सरपंचासह तलाठी कृषी सहाय्यक व गावातील प्रशासकीय यंत्रणा यांना धरले धारेवर, विविध प्रश्नांच्या मुद्द्यावर नागरीक चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले यावी अतिदृष्टीने झोडपलेल्या पिकांचे पंचनामे हे तोंड बघून केले गेले असा आरोप थेट शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांना जाब विचारत खोटे पंचनामे कोणाच्या सांगण्यावरून केले असा देखील संतप्त सवाल यावेळी गावकऱ्यांनी विचारला गावातल्या विकास कामांवर देखील ग्रामसेवक यांना गावकऱ्यांनी धरले धारेवर.. अनेक शासनाच्या योजना हे अधिकारी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत व पोचल्या तर त्यात त्यांचे कमिशन हे ठरलेले असते म्हणूनच वैतागलेल्या छाईल गावाच्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत येथील प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारात धारेवर धरले शासन वेगवेगळ्या स्तरावर जनसामान्यांपर्यंत व्यक्तिगत लाभाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न राज्यस्तरावर करीत असते. मात्र ग्रामीण भागात याउलट चित्र पाहायला मिळतो अनेक आदिवासी दलित बहुजन लाभार्थ्यांना व्यक्तिगत लाभाच्या योजना पासून जाणीवपूर्वक लांब ठेवले जाते व अनेक शासकीय योजना निव्वळ कागदावर दाखवून पैसे लाटण्याचे काम हे अधिकारी करीत असतात असा आरोप यावेळी छाईल ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी प्रशासकीय यंत्रणेवर केला आहे व याची चौकशी देखील येणाऱ्या काळात करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा