Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

बागलाण तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी 22 कोटि 77 लाख रु.निधी मंजूर - खा.डॉ. सुभाष भामरे व आमदार दिलीप बोरसे चा पाठपुराव्यला यश



साक्री प्रतिनिधी:बागलाण तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेले 30 किलोमीटर लांबीचे असलेल्या पाच रस्त्यांच्या कामांना सुमारे 22 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर झाले आहे अशी माहिती माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची कामे उत्कृष्ट पद्धतीने होण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत बागलाण तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांच्या समावेश प्रधानमंत्री ग्रामसड़क योजनेत करण्यात आला,या प्रमुख रस्त्याच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत या रस्त्यांच्या कामाचा समावेश होण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री मा.ना. गिरीराज सिंग,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस ग्राम विकास मंत्री मा.ना.गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा केलेला होता त्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिनांक 12/1/2023 या दिवशी या रस्त्याच्या कामांना मंजुरी दिली त्यात तालुक्यातील बंधारपाड़े- वनोली - चौधाने फाटा या 3.840किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 99 लाख रुपये निधी मंजूर झाला त्याचप्रमाणे नामपुर-फोकीर- गोराने- आसखेडा या 8.750 किलोमीटर रस्ता सुधारणा करण्यासाठी 6 कोटी 30 लाख रुपये, सोमपूर- दरेगाव- कातरवेल या7.920 कीलोमीटर कामासाठी 6 कोटी रुपये मंजूर झाले.रा मा 19 चौधाने फाटा- जोरण - मोरकुरे-पठावे दिगर या 6 .130किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी 36लाख रुपयांचा निधी मंजूर झाला, एकलहरे रोड -जायखेडा- लाडूद 4 किलोमीटरच्या कामासाठी 3 कोटी 10लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असे एकूण 22 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदरचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात यश आले असून लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरुवात करण्यात येईल असे माहित माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खा. डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध