Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
साखर कारखान्यांनी बायो प्रॉडक्टची निर्मिती करणे काळाची गरज,तोट्यात गेलेल्या सहकारी संस्था पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुनर्जीवित करू - छगन भुजबळ
साखर कारखान्यांनी बायो प्रॉडक्टची निर्मिती करणे काळाची गरज,तोट्यात गेलेल्या सहकारी संस्था पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुनर्जीवित करू - छगन भुजबळ
मातोरेवाडी, राजाराम नगर ता.दिंडोरी येथे कादवा सहकारी साखर कारखाना,आसवनीसह (डिस्टीलरी) इथेनॉल प्रकल्प उदघाटन शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार नरेंद्र दराडे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,
कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हा.चेअरमन शिवाजी बस्ते, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने,डॉ.योगेश गोसावी, गणपतराव पाटील, राजाराम बस्ते, भास्करराव भगरे, दत्तात्रय पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तसेच भविष्यातील इंधनाची गरज भागविण्यासाठी बायो प्रॉडक्टची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. असे सांगत राज्यात अनेक सहकारी संस्था तोट्यात गेल्या आहे. या संस्था खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुनर्जीवित करू.
कादवा कारखान्याने इथेनॉलचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तो अतिशय स्तुत्य आहे. कारण बायप्रॉडक्टशिवाय कारखाने तग धरू शकणार नाही. इथेनॉल फक्त पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठीच वापरले जाते असे नाही तर मद्यनिर्मिती, सौंदर्य प्रसाधने, विविध प्रकारची रसायने, द्रावक, संवर्धक, औषध निर्मितीसाठीही वापरतात. सध्या पेट्रोलची वाढती गरज विकसनशील देशांमध्ये आहे. म्हणजेच इथेनॉलची गरज वाढणार आहे. पुढील दहा वर्षांत विकसनशील राष्ट्रांची इथेनॉलची गरज वाढणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त इथेनॉल निर्मीतीकडे लक्ष दिले तर त्याचा फायदा संस्थेसोबतच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहे.
छोट्या छोट्या संस्थांमध्ये भाग घेऊन जबाबदारी सांभाळत तालुक्याच्या विकासासाठी श्रीराम शेटे यांनी मोलाचे योगदान दिले.महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्याची ओळख आहे. कारखान्यात उसापासून इथेनॉल निर्मिती करून देशहित तर साध्य होईलच, परंतु गरीब शेतक-यांच्या घरात दोन पैसे जातील व त्यांचे जीवनमान उंचावेल. शिवाय इथेनॉलमिश्रित पेट्रोलपासून प्रदूषणही होत नाही जी काळाची गरज आहे.
मांजरपाडा प्रकल्प पूर्ण केला आहे. या ठिकाणी गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून नार पार प्रकल्पाद्वारे हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्याची तहान भागुन हा भाग सुजलाम सुफलाम होईल.तसेच पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हवा बदलत असून राज्यात महाविकास आघाडीकडे जनतेचा कौल असून आपल्या हिताचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला.
राज्याच्या सहकार मंत्र्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षाची शिफारस आणा आणि सहकारी संस्थांना परवानगी घ्या असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्य बाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठविला जाईल असे यावेळी स्पष्ट केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा