Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ता काँक्रीटीकरण व सोयीसुविधा साठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ता काँक्रीटीकरण व सोयीसुविधा साठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर
शिरपूर प्रतिनिधी : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ता काँक्रीटीकरण व सोयीसुविधा साठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. विकास-२०२३/प्र.क्र.५/ यो-६ दि. ३ फेब्रुवारी २०२३ च्या आदेशा सोबतची अनुसूची-2515,1238 अंतर्गत शिरपूर तालुक्यातील (सा.बां.वि.) विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे.
फत्तेपूर फॉ. गाव/पाडे अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे 10 लाख रुपये, गधडदेव गाव/ पाडे अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे,चाकडू गाव/पाडे अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे 10 लाख रुपये, बुडकी येथे रस्ता काँक्रीटीकरण/ सोयी-सुविधा करणे 10 लाख रुपये,बुडकी विहीर (टेंभेपाडा) येथे रस्ता कॉक्रीटीकरण / सोयी सुविधा करणे 10 लाख रुपये, न्यू बोराडी येथे रस्ता कॉक्रीटीकरण/ सोयी-सुविधा करणे 10 लाख रुपये, खाऱ्यापाडा (टेंभेपाडा) येथे रस्ता कॉक्रीटीकरण/ सोयी-सुविधा करणे 10 लाख रुपये, तिखीबर्डी येथे रस्ता कॉक्रीटीकरण/ सोयी-सुविधा करणे 15 लाख रुपये, उमरदा येथे रस्ता काँक्रीटीकरण / सोयी-सुविधा करणे 10 लाख रुपये, दोंडवाडा येथे रस्ता कॉक्रीटीकरण/ सोयी-सुविधा करणे 10 लाख रुपये, पळासनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण/ सोयी-सुविधा करणे (अमरधामकडे जाणारा रस्ता) 10 लाख रुपये, हनुमानपाडा (उमरचा) येथे रस्ता काँक्रीटीकरण / सोयी-सुविधा करणे 15 लाख रुपये, सांगवी येथे गाव अंतर्गत कॉक्रीट रस्ता करणे 15 लाख रुपये, खंबाळे येथे गाव अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, पनाखेड येथे गाव अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे 10 लाख रुपये, आंबे (अमरिश नगर) येथे कांक्रीट रस्ता करणे 10 लाख रुपये, हिगाव येथे कॉक्रीट रस्ता करणे 10 लाख रुपये, रोहिणी येथे कॉक्रीट रस्ता करणे 10 लाख रुपये, लाकडया हनुमान येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे 10 लाख रुपये, नटवाडे येथे गाव अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे 10 लाख रुपये, सुळे येथे गाव अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे 10 लाख रुपये, चिलारे येथे गाव अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये, सुभाष नगर येथे गाव अंतर्गत कॉक्रीट रस्ता करणे 15 लाख रुपये, बलकुवे येथे सामाजिक सभागृह बांधणे 15 लाख रुपये, बोराडी येथे ओपन जिम साहित्य बसविणे 5 लाख रुपये, नवी अंतुर्ली येथे कॉक्रीट रस्ता करणे 15 लाख रुपये, भटाणे येथे कॉक्रीट रस्ता करणे 10 लाख रुपये, वरूळ येथे कॉक्रीट रस्ता करणे 7.50 लाख, लोंढरे येथे कॉक्रीट रस्ता करणे 7.50 लाख, बाभुळदे येथे गाव अंतर्गत सोई सुविधा करणे 10 लाख रुपये, टेंभे बु. येथे गाव अंतर्गत सोई सुविधा करणे 10 लाख रुपये, करवंद येथील गोरक्षनाथ मंदिर येथे सोई सुविधा करणे 15 लाख रुपये, करवंद येथे गाव अंतर्गत कॉक्रीट रस्ता करणे 15 लाख रुपये, शिंगावे येथे गाव अंतर्गत कॉक्रीट रस्ता करणे 10 लाख रुपये,कळमसरे येथे गाव अंतर्गत कॉक्रीट रस्ता करणे 10 लाख रुपये, उंटावद येथे गाव अंतर्गत सभामंडप बांधणे 10 लाख रुपये, पिंप्री येथे गाव अंतर्गत सोई सुविधा करणे 10 लाख रुपये, हिसाळे येथे गावांतर्गत मलखान नगर येथे सोई सुविधा करणे 10 लाख रुपये, बभळाज येथे गावांतर्गत सोई सुविधा करणे 10 लाख रुपये, होळ येथे गाव अंर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे 15 लाख, भाटपुरा येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे 10 लाख रुपये, मांजरोद येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये,
सावळदे गावांतर्गत मुख्य रस्ता राष्ट्रीय महामार्ग ते स्व. सुभाष जिभाऊ यांच्या घरा पर्यंत कॉक्रीटीकरण 15 लाख रुपये, सावळदे गावांतर्गत मुख्य रस्ता स्व. सुभाष जिभाऊ यांच्या घरा पासून तापी नदीकडील रस्त्यापर्यंत कॉक्रीटीकरण करणे 15 लाख रुपये असे एकूण 5 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने सातत्याने शिरपूर शहर व तालुक्यातील अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर होत असल्याने तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा