Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

धुळे मॅरेथॉन स्पर्धेचे शानदार आयोजन...पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेडी यांनी केली मार्गाची पाहणी...



धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 5 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 5:00 वाजता पोलीस मुख्यालय धुळे येथे मॅरेथॉन स्पर्धेचे शानदारितीने आयोजन करण्यात आले आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेसाठी वीस हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केलेली आहे तर प्रथम तीन विजेत्यांसाठी बक्षीसही ठेवण्यात आली आहे.
तर या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
तर सदर कार्यक्रमास कविता राऊत अर्जुन पुरस्कार विजेत्या, अश्विनी देवरे आयर्नमन , क्रांती साळवी नऊवारी साडी मध्ये मॅरेथॉन धावणारी प्रथम महिला, ट्रिपल महाराष्ट्र केशरी सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, मृणाल गायकवाड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल व मिसेस इंडिया हे प्रमुख मान्यवर ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून उपस्थित राहणार आहे....
तरी या मॅरेथॉन स्पर्धा होणाऱ्या मार्गाची सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी पाहणी केली आहे....
त्यांच्यासमवेत यावेळी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, चाळीसगाव रोड पो. ठाण्याचे सहायक पो.निरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध