Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळ्याचे खा.सुभाष भामरेंच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन संपन्न...!!
धुळ्याचे खा.सुभाष भामरेंच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन संपन्न...!!
धुळे - शिवजयंतीचे औचित्य साधत आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी संपन्न झाले. भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारला जात आहे.
महानगरपालिकेच्या अडीच कोटी रुपयांच्या निधीतून 18 फुटी पुतळा साकारला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा अशी मागणी तमाम शिवभक्तांच्या वतीने करण्यात आले होती. त्याच माध्यमातून गेल्या वर्षभरापूर्वीच मनपाच्या स्थायी समिती सभेत या पुतळ्याचा विषय मंजूर करण्यात आला आहे. पूर्णाकृती पुतळा होत असल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रसंगी खा. डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी , भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उपमहापौर नागसेन बोरसे, शितल नवले, मनपा विरोधी पक्ष नेत्या कल्पना महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव, माया परदेशी , अल्फा अग्रवाल यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा