Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळ्यात शिवजयंतीच्या होल्डिंग कारवाई संदर्भात तरुणाईचा आक्रोश मोर्चा स्वराज्य रक्षक यांच्या जयंतीचे कारवाई नियम रद्द करा...!
धुळ्यात शिवजयंतीच्या होल्डिंग कारवाई संदर्भात तरुणाईचा आक्रोश मोर्चा स्वराज्य रक्षक यांच्या जयंतीचे कारवाई नियम रद्द करा...!
धुळे :-शहरातील पालिका हद्दीतील मोठमोठे बॅनर काढल्यामुळे सर्व शिवप्रेमींचा धुळे शहर पोलीस येथे मोर्चा काढण्यात आला मोर्चा मागणी असे की आम्हाला बॅनर लावण्याची परवानगी द्यावी व त्यासाठी लावलेले नियम मागे घ्या. यासाठी शहर पोलीस स्टेशनचे पी आय कोकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने लावण्यात आलेले बॅनर 2 तारखेला काही कारणामुळे महानगरपालिकेतर्फे काढण्यात आले. मागच्या वर्षीही भरपूर बॅनर काढले गेलेत यावर्षी वीस दिवसा अगोदर लावण्यात आलेले बॅनर संपूर्ण धुळे शहराला शिवमय करण्यात आले परंतु पालिका प्रशासनामुळे ही कारवाई करण्यात आली. शहरातील प्रत्येक तरुणाचा प्रश्न आहे की ज्या महापुरुषांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांची जयंती वर्षातून एकदा येते तरीही हे नियम कशासाठी..? बॅनर लावण्यामुळे आत्तापर्यंत कोणालाही त्रास झाला नाही मग ही कारवाई कशासाठी असे प्रश्न निर्माण झाले. यासाठी सर्व तरुण वर्ग मोर्चेसाठी सहभाग झाले व छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देऊन शहर पोलीस स्टेशन येथे मोर्चेचा थांबा झाला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा