Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोन इसमानवर कारवाई....



शिरपूर प्रतिनिधी – शिरपूर शहरात अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोन इसमानवर कारवाई करत मुद्देमाल जप्त करून शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे शहरात अवैधरित्या घरगुती गॅसच्या वाहनांमध्ये भरण्यासाठी वापर करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

शिरपुर शहर पो.स्टे.चे पो.नि.ए.एस. आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,शिरपुर जि.धुळे शहरातील रामसिंग नगरकडे जाणाऱ्या स्त्याजवळील हॉटेल भाऊ समोरील परीसरात वाहनांमध्ये गॅस सिलेंडर मधुन अवैधरित्या गॅस भरत असल्याबाबत बातमी मिळाली होती.

बातमीनुसार पो.नि.आगरकर यांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती प्राजक्ता सोमलकर,पोउनि / संदीप मुरकूटे व शोध पथकाचे अंमलदार यांचेसोबत खात्री केली असता दि.०३/०१/२०२३ रोजी १३.३० वाजेचे सुमारास शिरपूर जि.धुळे शहरात रामसिंग नगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हॉटेल भाऊ समोरील रस्त्याचे पलिकडे पुर्वेस श्रीकृष्ण सव्हॉस सेंटर नावाने गाळा असलेल्या खोलीमागील जागेत व साई डिजीटल समर्थ ऑईल नावाचे पत्रटी दुकान येथे इसम नामे- (१) गणेश मोहन माळी वय २४ व २) दिनेश राजेंद्र माळी वय ३१ दोन्ही रा.वरवाडे शिरपुर जि.धुळे असे गैरकायदेशीर रित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस ईलेक्ट्रीक मोटारीचे सहाय्याने वाहनांमध्ये भरण्यासाठी वापर करीत असतांना एकुण ४२,०००/- रुपये किंमतीचे एकूण ११ भारत कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर,०२ इलेक्ट्रीक मोटार,०२ वजनकाटे अशांसह मिळुन आलेने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द पोकों/गोविंद सुरेश कोळी नेम.शिरपुर शहर पो.स्टे.यांचे तक्रारीवरून जीवनावश्यक वस्तु कायदा सन १९५५ मधील कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि.श्री.ए.एस. आगरकर करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.किशोर काळे यांचे मार्गदर्शना खाली श्री.ए.एस.आगरकर पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर,पोउनि / संदीप मुरकूटे,शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील,पोना/मनोज पाटील, गोविद कोळी,विनोद अखडमल व प्रशांत पवार अशांनी मिळून केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध