Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळाल्याने धुळ्यात शिंदे गटाचा कार्यकर्त्यांचा जल्लोष.......!! निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का.....!!
शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळाल्याने धुळ्यात शिंदे गटाचा कार्यकर्त्यांचा जल्लोष.......!! निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का.....!!
धुळे - शिवसेना पक्ष व धनुष्यबान चिन्ह निवडणुक आयोगाच्या निर्णयानुसार शिंदे गटाला मिळाल्याने धुळ्यात शिंदे गटाच्या वतीने महाराणा प्रताप चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोश साजरा करण्यात आला आहे. या निर्णया मुळे शिंदे गटाच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या काळात राज्याच्या राजकीय वातावरणात बदल झालेला दिसेल व अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतील अशी प्रतिक्रिया सेनेच्या पदाधिकार्यांनी जल्लोषाप्रसंगी दीली आहे. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे लागून होते. अनेक वेळा दावे प्रती जावे केले जात होते. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची ? याबाबत राज्याच्या राजकारणात संभ्रम निर्माण झाला होता. शिंदे व ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे भवितव्य या निकालावर अवलंबून असल्याने या निकाला निकाल आला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावनी नंतर निवडणूक आयोगाकडे हा निर्णय वर्ग करण्यात आला होता. त्यात निवडणूक आयोगाने शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा दाखला देत शिवसेना पक्ष व धनुष्यबान चिन्ह शिंदे गटाला दिल्याने शिंदे गटाच्या वतीने महाराष्ट्रभरात जल्लोष साजरा करण्यात आला. तर या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का लागला असून राज्याच्या राजकारणाला ढवळून निघणारा हा निकाल असल्याची प्रतिक्रिया सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रसंगी महानगर प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख सतीश महाले, संजय गुजराती, संजय वाल्हे, विजय अग्रवाल, यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा