Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
क्रीडांगणासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा गैरवापर..साक्री तालुक्यातील दहिवेल एज्युकेशन सोसायटीवर कारवाई करण्याची दहिवेल ग्रामस्थांची मागणी...
क्रीडांगणासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा गैरवापर..साक्री तालुक्यातील दहिवेल एज्युकेशन सोसायटीवर कारवाई करण्याची दहिवेल ग्रामस्थांची मागणी...
धुळे - साक्री तालुक्यातील मौजे दहिवेल येथील सरकारी क्षेत्रातील गावठाण कडे वर्ग झालेल्या क्षेत्रामधून दहिवेल एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेला 2005 चौरस मीटर जमीन ही क्रीडांगणासाठी मंजूर करण्यात आली होती. मात्र या जमिनीचा संस्थेने अटी शर्तीचा भंग करत बेकायदेशीर उपयोग केलेला आहे सदर या जमिनीवर खाजगी इमारती उभ्या केल्या असल्याचा आरोप करत जमिनीची चौकशी करून हा भूखंड सरकार जमा करावा अशा मागणीचे निवेदन दहिवेल ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.....
सदर सार्वजनिक हितासाठी शासनाने ज्या अटी शर्ती घातल्या होत्या त्या अटी शर्तीचा भंग करण्यात आला आहे शासनाने दिलेल्या जमिनीच्या भाडेपट्टा ची मुदत 2009 मध्ये संपुष्टात आली असल्याची माहिती ही यावेळी देण्यात आली आहे.
या जमिनी संदर्भात जिल्हाधिकारी स्तरावरून कुठलाही अंतिम आदेश दिला नसताना या जमिनीवर खाजगी कब्जा करण्यात आला असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. सार्वजनिक हिताचा भूखंड असताना त्या ठिकाणी संस्थाचालकांनी त्या जागेवर कब्जा करत तो गिळकुंट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या जागे संदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी सदरचा भूखंड हा शासन जमा करावा अशी मागणी साक्री तालुक्यातील दहिवेल येथील ग्रामस्थांनी धुळे जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदनातून केली आहे........
सदर निवेदन देतेवेळी राजेंद्र बच्छाव, हिम्मतराव बच्छाव, श्रावण माळी, सुधीर मराठे, बापू माळी,राजेंद्र वाघ, महेंद्र बच्छाव, हर्षदीप पाटील आधी यावेळी उपस्थित होते.......
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा