Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

नंदुरबार शहरात एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याने तणाव; लव जिहाद प्रकरणाचा संदर्भ ?



नंदुरबार प्रतिनिधी- नंदुरबार जिल्ह्यातील काळी मशीद लगतच्या बोळीमध्ये एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.लव जिहाद प्रकरणातून ही हत्या झाल्याचे समजते.तथापि पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद होणे बाकी असून नेमका काय प्रकार आहे ते उघड होऊ शकलेले नाही. 

प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री सात वाजे दरम्यान संबंधित युवक काळी मशीदी लगतच्या बोळीतून पीडब्ल्यूडी ऑफिस कडे जात होता त्याचप्रसंगी अंधारामध्ये एकाने त्याच्यावर चाकूने जबर हल्ला केला.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा आरडाओरड ऐकून लोक धावून आले.दरम्यान हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. जमावाने जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना त्याची प्राणज्योत मालवली.दरम्यान या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार हत्या झालेला तरुण खाटीक समाजाचा आहे.त्याने तीन वर्षांपूर्वी हिंदू मुलीशी प्रेम विवाह केला होता.

मुलीच्या परिवाराकडून प्रचंड विरोध असतानाही ते घडून आले होते.लव्ह जिहादच्या त्या प्रकारातूनच ही हत्या घडल्याचे समजते.परंतु अशी कोणतीही नोंद अद्याप अधिकृतपणे कुठेही झालेली नाही.तरुणावर हल्ला झाल्याचे प्रकरण कळताच नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक कळमकर यांच्यासह संपूर्ण पोलीस ताफा घटनास्थळी धावून गेला.जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या सूचनेनुसार संपूर्ण मच्छी बाजार इलाही चौक काळी मशीद परिसर या भागात बंदोबस्त लावण्यात आला.त्या भागातील तणाव नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध