Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे ! विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी



मुंबई,नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरं व्हावं, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं अर्थसंकल्पात 500 कोटींची घोषणा करण्यात आली होती. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.
विधीमंडळ सदस्यांनी सभागृहात विविध आयुधांव्दारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य, मुद्देसूद लेखी उत्तरे देण्यात यावीत, आदी मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या.
. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारी पासून मुंबई चालू होत आहे हे अधिवेशन 25 मार्च पर्यंत म्हणजे चार आठवडे होणार असल्याने या अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याचा वाढवून हे अधिवेशन पाच आठवडे करावे अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता . 9 मार्च रोजी सन 2023 -24 चा . अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अर्थसंकल्पात राज्यातील जनतेला किती दिलासा देते यावरच अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाज होणार असल्याचे जाणकारांच म्हणणे आहे तसेच 14 फेब्रुवारी पासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतून फुटून निघालेल्या शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसेच धनुष्यबाणावरील चिन्हाची लढाई याबाबतचा निर्णय व ओबीसी आरक्षणा बाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका या सर्व घटनांचा तपशील बघता यावर काय निर्णय होतो यावरच राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे भवितव्य अवलंबून असणार आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध