Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३
मराठी भाषा दिनानिमित्त कॅलिग्राफी शब्द स्पर्धा...
मुंबई : (विश्वनाथ पंडित) कुसुमाग्रज जन्मदिन तथा मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि दादर सार्वजनिक वाचनालय,धुरू हॉल ट्रस्टच्याच्या वतीने 'मराठी विचारधारा प्रतिष्ठान' पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती 'मराठी सुविचार आणि म्हणी' या विषयावर आधारित राज्यस्तरीय मराठी कॅलिग्राफी शब्द स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थी, कलाशिक्षक,चित्रकार, हौशी चित्रकार या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. पहिल्या क्रमांकाला सन्मानचिन्हासह रोख इतर तिघांना रोख पारितोषिक तर इतरांना सहभाग प्रमाणपत्र २६ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या
मराठी भाषा दिवस कार्यक्रमात देण्यात येईल. स्पर्धेची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी आहे. स्पर्धेचे नियम व अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळे ९८२१५७४८९१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर,ॲड.देवदत्त लाड यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा