Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
तोंदे ग्रामपंचायतीतील अतिक्रमण तोंडण्यास नवनियुक्त सरपंचाची दिरंगाई मागील कारण काय ? याबाबत ग्रामस्थांन मध्ये लावले जात आहेत तर्क-विर्तक
तोंदे ग्रामपंचायतीतील अतिक्रमण तोंडण्यास नवनियुक्त सरपंचाची दिरंगाई मागील कारण काय ? याबाबत ग्रामस्थांन मध्ये लावले जात आहेत तर्क-विर्तक
शिरपूर प्रतिनिधी:- चालूच दोन महिन्यापुर्वी शिरपूर तालुक्यातील काही ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणूकीला सामोरे गेल्यात यात ब-यास ठिकाणी आजी-माजी स्थानिक नेत्याबरोबरच काही हौवश्या-नवश्या व गवश्यांनी देखील आपणच गावातील मातब्बर व धुरंधर नेता असल्याचे दाखवत निवडणूकीत भाग घेतले होते. यात हौवश्या-नवश्या व गवश्यांना जनतेने त्यांची जागा दाखवत व काही ठिकाणी मातब्बरांना देखील धुळ चारत सत्तातर झाले. यातच शिरपूर तालुक्यातील तोंदे ग्रामपंचायतीत देखील सत्तातर झाले.
तोंदे ग्रामपंचायतीचे नविन नवनियुक्त सरपंच यांनी सत्ता हातात घेतली-ना घेतली, तोच मागील सत्ताधीश्याच्या कारकिर्तीत उभे राहिलेल्या अतिक्रमणाची जमिनदोस्त करण्याचा आदेश नवनियुक्त सरपंच यांच्या हाती आला.विशेष म्हणजे सदर अतिक्रमणाबाबत ति-हाईत ग्रामस्थांने केलेल्या तक्रारी नुसार चौकशी करण्यात आलेली होती.त्या चौकशीचा आदेश होण्यासाठी देखील पंचायत समिती तपासणी अधिकारी यांनी आदेश करण्यास खूपच दिरंगाई केली. दिरंगाई म्हणजे ग्रामपंचायतीत सत्ता कायम राहिल असेच धरुन तपासणी अहवाल देण्यास टाळाटाळ होत होती. मात्र अखेर ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले आणि अचानक अधिका-याचे डोळे खाडकन उघडले.व तात्काळ तक्रारदाराच्या अर्जातील विवादीत अतिक्रमण तोडण्याचा आदेश झाला. मात्र आदेशात देखील नवनियुक्त सरपंच यांना अतिक्रमण तात्काळ तोडण्याबाबत आदेशात नमुद केलेले आहे.
प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायतीने संबंधीत अतिक्रमण धारकास नोटीस देखील बजावलेली असल्याची माहिती मिळालेली आहे.
आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या माहिती नुसार सदर शासकिय प्रयोजनार्थ राखीव जागेत अतिक्रमण करणा-या व्यक्तीने सदर अतिक्रमण केलेल्या जागेवर एक किराणा दुकान व एक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे रेशन दुकान अश्या दोन व्यक्तीना भाडे तत्वावर दिलेले होते. मग या शासकिय जागेवर अतिक्रमण करुन दुकाने भाडेतत्वावर देऊन शासनाची कोणतीही परवानगी न घेता अतिक्रमीत जागेवर पोट भाडेकरु ठेवून उत्पन्न मिळविलेले आहे.ते शासनास म्हणजे ग्रामपंचायत उत्पन्नात भर टाकणारी बाब असल्याने सदर शासकिय जागेवर मिळविलेले भाडे रुपी उत्पन्न ग्रामपंचायत वसुल करेल काय ? नेमके हे अतिक्रमण केव्हा तोडण्यात येईल? याकडे देखील सर्वच ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.तर नेमके आदेश होऊन देखील अतिक्रमण का तोडले जात नाही. याबाबत नवनियुक्त सरपंच याच्यावर काही दबाब तर टाकण्याचा कोणी प्रयत्न करित नाही काय ? अश्याप्रकारे ग्रामस्थांमध्ये तर्क विर्तक लावले जात आहेत.
(सविस्तर वाचा पुढील अंकात)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा