Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक शैक्षणिक कर्ज मंजूर करावे - आ. अमरिशभाई पटेल यांची पत्रकान्वये मागणी....
धुळे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक शैक्षणिक कर्ज मंजूर करावे - आ. अमरिशभाई पटेल यांची पत्रकान्वये मागणी....
शिरपूर प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक शैक्षणिक कर्ज मंजूर करावे अशी मागणी माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी पत्रकान्वये मागणी केली आहे.
मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबई व्यवस्थापकीय संचालक लालमिया शेख यांना प्रत्यक्ष भेटून शैक्षणिक कर्ज लवकरात लवकर मंजूर व्हावे या मागणीचे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांचे पत्र देण्यात आले.
आमदार अमरिशभाई पटेल,आमदार काशिराम पावरा,माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, शिरपूर एज्युकेशन सोसायटी सचिव प्रभाकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनखाली हे निवेदन मुंबई येथे शि.व.न.पा.शिक्षण मंडळ माजी सभापती जाकीर अहमद शेख नजीर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सैय्यद जाकीर, सामाजिक कार्यकर्ते सैय्यद आरीफ यांनी दिले.
आमदार अमरिशभाई पटेल यांनी पत्रात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात अल्पसंख्यांक विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण घेत आहेत. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टीकोनातून हा अल्पसंख्यांक समाज शिक्षण घेत असतो.धुळे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक शैक्षणिक कर्ज या योजने अंतर्गत कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहेत.परंतु अद्यापपावेतो त्यांनी सादर केलेले अर्ज मंजूर झाले नसून त्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यास काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शैक्षणिक कर्जासाठीचे अर्ज मंजूर व्हावेत,जेणे करून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.लवकरात लवकर शैक्षणिक कर्ज मंजूर करावे असे निवेदनात म्हटले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा