Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ मार्च, २०२३



घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,07 गुन्हे उघड करुन 09 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत…!! 




नंदुरबार जिल्हा पोलीस गुन्हे बैठकीत जिल्ह्यातील मालमत्तविरुध्दचे घरफोडी,चोरी इत्यादी गुन्ह्यांचा गुन्हे आढावा दरमहा घेण्यात येत असतो. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.तसेच पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करून घडलेले गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करणे हे मोठे आव्हान होते.त्याअनुषंगाने घरफोडीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पालीस निरीक्षक श्री.किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत घरफोडीच्या गुन्ह्यांच्या पध्दतीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर  पाळत ठेवून होते.तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवून मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते.

दिनांक 29/03/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.मी. आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील वेडुभाऊ गोविंद नगरमध्ये एक धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील धनेर गावाचा तरुण राहात असून काही एक काम धंदा करीत नाही तसेच त्याच्या हालचाली ह्या संशयास्पद वाटत आहे अशी बातमी मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार खेडकर यांना सांगितली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून त्यांना मिळालेल्या बातमीमधील संशयतास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील बेडुभाऊ गोविंद नगर परिसरात जावून संशयित आरोपी नामे हेमंत सोनवणे याचा शोध घेतला असता तो कन्यादान मंगल कार्यालय परिसरात फिरत असल्याचे समजून आल्याने पथकाने कन्यादान मंगल कार्यालयाजवळ एका काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटार सायकल एक तरुण मिळून आला.त्यास त्याचे नाव गाव विचारले असता, नाव हेमंत अनिल सोनवणे वय 25 वर्ष रा.धर ता.साक्री जि.धुळे ह.मु.गोविंद नगर, नंदुरबार ता. जि.नंदुरबार असे सांगितले.त्यास विचारपूस करीत असतांना तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या खिशात एक गुलाबी रंगाचे श्री ज्वेलर्स असे लिहिलेले पाकीट मिळुन आले. त्यात 3,900,875/- रुपये किमतीचे सोन्याचे विविध दागिने मिळून आल्याने त्यास त्याबाबत विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्याने सदरचे सोन्याचे दागिने हे त्याचे इतर दोन साथीदार नामे 1) तुलशिराम उर्फ तुलशिदास रामचमाळ ता.साक्री जि.धुळे 2) अनिल पवार रा. तोरणकुडी पो.धनेर ता.साक्री जि.धुळे अशांच्या मदतीने तीन दिवसापुर्वी नंदुरबार शहरातील कोकणीहिल परिसरातील एका बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरी केल्याचे सांगितले. त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे ख कलुप,त्याबाबत 1) नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 191/2023 भा.द.वि. कलम 457.3802) उ. 2/3 गु.र.नं. 18/2023 भा.दं.वि.कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.तसेच सुमारे वृंदावन कॉलनी, नंदुरबार येथील हनुमान मंदिर गेट समोरील एका बंगल्याचे बंद दरवाज्याचे कडीकोंडा तोडून (घरफोडी करून) चोरी केली असल्याचे सांगितले.हेमंत अनिल सोनवणे याच्या ताब्यात मिळून आलेल्या सोन्याचे दागिने व मोटार सायकल कायदेशीर कारवाई करुन जप्त करण्यात आली.

संशयीत आरोपीताकडुन नंदुरबार जिल्हयातील मालमत्तेविरुध्दूचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखा,नंदुरबार येथे आणून अधिक विचारपुस केली असता, त्याने व त्याचे इतर दोन साथीदार यांचे मदतीने नंदुरबार शहरातील सुमारे चार महिन्यापूर्वी गाझी नगर लगत असलेली बॅटरी इन्व्हर्टर दुकान तसेच एस्सार पेट्रोलपंप शेजारी बॅटरी इन्व्हर्टरचे दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन इन्वर्टर व बॅटया, नंदुरबार शहरातीलच वृंदावन कॉलनी, वर्धमान नगर, बेडुभाऊ गोविंद नगर येथील बंद घराचे कुलूप, कोयंडा तोडून घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम, LED TV तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील शिवपूर व अंबापूर परिसरातील व इतर शेत शिवारातील सौर ऊर्जा प्लेट चोरी केलेबाबत सविस्तर हकिगत सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेला हेमंत अनिल सोनवणे यास त्याने चोरी केलेला मुद्देमालाबाबत विचारले असता चोरी केलेल्या 02 मोटार सायकलच्या बॅट-या व 01 इन्व्हर्टर त्याचे धानोरा येथील गॅरेजमधून अनोळखी इसमांना विक्री केल्याचे व उर्वरीत बॅटल्या व ()4 इन्व्हर्टर त्याच्या धनेर ता.साक्री जि. धुळे येथील त्याच्या राहते घरी लपवून ठेवल्याचे सांगितले. बेडुभाऊ गोविंद नगर येथे केलेल्या चोरीमधील चोरी केलेले काही सोन्याचे दागिने त्याचा नंदुरबार शहरातील एका सोनार मित्रास विक्री केल्याचे सांगितले.त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 126/2023 भा.दं.वि.कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 68,500/- रुपये किमतीच्या 07 बॅटऱ्या व 16,000/- रुपये किमतीचे 04 इनकर्टर जप्त केलेले आहे. त्याबाबत 1) नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 637/2022 भा.दं.वि. कलम 457, 3802) नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं.679/2022 भा. दं.वि. कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच LED TV व सौर उर्जेच्या प्लेट त्याचे दोन साथीदार 1)तुलाराम उर्फ तुलशिदास भिल्लू चौरे रा.मचमाळः ता. साक्री जि.धुळे 2) अनिल गणेश पवार रा. तोरणकुडी पो. घनेर ता. साक्री जि. धुळे यांचेकडे असून दोन्ही संशयीत आरोपी LED TV विक्री करण्यासाठी नंदुरबार शहरात वॅगन आर वाहनाने येणार असल्याचे सांगितले.
 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरात सानी कडुन येणाऱ्या रस्त्यावर साध्या वेशात सापळा रचला. त्याच दरम्याने साक्री गावाकडून नंदुरबारच्या दिशेने एक आकाशी रंगाची वॅगनआर कंपनीची गाडी येत असल्याचे दिसलो म्हणून सदर वाहन थांबवून वाहनातील दोन इसमांना त्यांचे नाव विचारले असता  तुलशिराम उर्फ तुलशिदास भिल्लु चौरे वय- 24 रा. मचमाळ ता.साक्री जि.धुळे 2) अनिल गणेश पवार वय-23 रा.तोरणकुडी पो भनेर ता.साक्री जि.धुळे असे सांगितले. वॅगन आर वाहनाची पाहणी केली असता वाहनात दोन LED TV, एक आयकॉनिक कंपनीचे काळया रंगाचे हेअर ड्रायर,एक लोखंडी कची कटर मिळुन आल्याने त्यांना त्याबाबत विचारपुस केली असता, त्यांनी ते दोन्ही TV व हेअर ड्रायर त्यांचा साथीदार हेमंत सोनवणे याच्या मदतीने नंदुरबार शहरात घरफोडी करुन चोरी केली असल्याचे सांगितल्याने सदर दोन्ही LED TV, हेअर ड्रायर व वॅगन आर कंपनीचे वाहन कायदेशीर कारवाई करून जप्त करण्यात आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेले) तुलशिराम उर्फ तुलशिदास भिल्लू चौरे 2) अनिल पवार यांना चोरी केलेल्या सौर प्लेटबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्या सौर प्लेट त्यांच्या घराच्या बाजूला लपवून ठेवल्याचे सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने EN KON कंपनीच्या 15 सौर ऊर्जा प्लेट व एक बॉक्स, अडानी कंपनीच्या 13 सौर उर्जा प्लेट व एक बॉक्स तसेच ANCHER कंपनीच्या एकुण 08 सौर उर्जा प्लेट, LIVBAT कंपनीच्या एकुण 09 सौर उर्जा प्लेट अशा एकुण 1,78,000/- रुपये किमतीच्या एकुण 45 सौर प्लेट व दोन बॉक्स कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.त्याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचा गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता 1) तालुका पोस्टे गुरनं 80/20232) उपनगर पोस्टे गुरनं 402/2022 प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
 
ताब्यात घेण्यात आलेले ) हेमंत अनिल सोनवणे वय 25 वर्षे रा.धनेर ता. साक्री जि.धुळे ह.मु.वेडगोविंद

नगर, नंदुरबार ता. जि. नंदुरबार 2) तुलशिराम उर्फ तुलशिदास भिल्लू चौरे वय-24 रा.मचमाळ ता. साक्री जि.धुळे

3) अनिल गणेश पवार वय-23 रा. तोरणकुडी पो.धनेर ता. साक्री जि. धुळे यांचेकडून सोनेचे दागिने, 45 सौर प्लेट,

07 इनव्हर्टर, 02 सौर प्लेट बॉक्स, 04 बँटया, 2 LED TV, हेअर ड्रायर मशिन, एक लोखंडी कटर असा एकुण

9,50,875/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तिन्ही आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील कारवाईकामी उपनगर

पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे अभिलेखावरील खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

1) उपनगर पोलीस ठाणे गुरनं 18/2023 भादवि कलम 454,457, 380 2) नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुरनं 191 / 2023 भादंवि कलम 454,457,380 (3) नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुरनं 126/2023 भादंवि कलम 454,457,380

4) नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुरनं 637/2022 भादंवि कलम 454,457,380 5) नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुरनं 679/2022 भादवि कलम 454,457,380 6 नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गुरनं 80/2023 भादंवि कलम 379 (7) उपनगर पोलीस ठाणे गुरनं 402 / 2022 भादंवि कलम 379 ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून नंदुरबार जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्वे एकुण 07 गंभीर गुन्हे उघडकीस आणून 9,50,875/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पथकास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास 10 हजार रुपये

रोख बक्षिस जाहीर केले.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी.आर.पाटील,अपर पोलीस अधिक्षक श्री.निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार खेडकर,सहा.पोलीस निरीक्षक श्री.संदीप पाटील,पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासुळ, पोलीस अंमलदार किरण मोरे, राजेंद्र काटके,शोएब शेख, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध