Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ एप्रिल, २०२३

धुळे शहराजवळ असलेल्या नकाने तलावात प्रेमी युगलाचा आत्महत्येचा प्रयत्न मुलीस वाचवण्यात यश मुलाचा मात्र बेपत्ता....




धुळे प्रतिनिधी:- धुळे शहराजवळ असलेल्या नकाणे तलाव येथे आज सायंकाळी एक जोडपं भेटण्यासाठी आले होते.मात्र दोघींमध्ये याठिकाणी काही वाद झाला,व ह्या वादाचे रूपांतर असे धक्कादायक होईल याचा कोणीच विचार केला नसेल असा प्रकार याठिकाणी घडला. साक्री तालुक्यात वस्तावास कल्याण रामेश्वर पाटील व 23 वर्षीय मुलगी हे दोघेही नकाने तलाव येथे भेटण्यासाठी आले होते मात्र याठिकाणी प्रेमी युगलाचा वाद झाल्याने कल्याण पाटील यांने सोबत असलेल्या तरुणीचा हात धरून थेट नकाणे तलावात उडी आत्महत्येचा प्रयत्न केला, यादरम्यान सदर तरुणी ही काठावरच असल्यामुळे त्या ठिकाणी गार्ड ड्युटीवर असलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान कन्हैया चौधरी यांचे लक्ष वेळीच ह्या तरुणीवर गेले असता त्यांनी लागलीच आपल्या जीवाची पर्वा न करता सदर तरुणीचा जीव वाचवला मात्र तरुण खोल पाण्यात गेल्याने त्याचा शोध घेता आला नाही.या ठिकाणी काही वेळातच राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि धुळे तालुका पोलिसांनी लागलीच धाव घेत राज्य आपत्ती दलाच्या कर्तव्यदक्ष टीमने या तरुणाचा देखील कसोशीने शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र हा तरुण त्यांना या ठिकाणी मिळून आला नाही. मात्र या ठिकाणी कन्हैया चौधरी यांच्या कर्तव्यदक्षिपणामुळे सदर तरुणीचा या ठिकाणी जीव वाचला आहे तिला सुरक्षित तिच्या घरच्यांसोबत पाठवण्यात आले आहे. 

यावेळी सदर मुलीला या घटने संदर्भात विचारणा केली असता तिने सांगितले की मला या मुलांशी काहीही संबंध ठेवायचे नाही होते तसेच त्याच्या मोबाईल मध्ये असलेले माझे फोटो देखील मला डिलीट करायचे होते यासाठी मी त्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आली होती मात्र कल्याण पाटील याला ही गोष्ट मान्य नसल्यामुळे त्याने मला जबरदस्तीने तलावाकडे घेऊन जातो सोबत घेऊन तलावात उडी मारली मात्र मी काही प्रयत्न करून काठावर आले त्यावेळेस या ठिकाणी गार्ड ड्युटीवर असलेल्या एका कर्मचाऱ्यांनी मला बाहेर काढले व माझा जीव वाचवला अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध