Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ मार्च, २०२३

राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वरील मालेगाव येथील चाळीसगांव चौफुली, टेहरे / सोयगांव फाटा व सवंदगांव फाटा येथे उड्डाण पुलांसाठी सुमारे 229 कोटी रुपयांचा निधी मंजूर, केंद्रीय सडक परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे खा. डॉ.भामरे यांनी मानले जाहीर आभार



धुळे – धुळे व मलेगांव लोकसभा मतदार संघाचे संसदरत्न खासदार डॉ. सुभाषजी भामरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून धुळे लोकसभा मतदार संघात मालेगाव शहाराजवळील चाळीसगांव चौफुली, टेहरे / सोयगांव फाटा व सवंदगांव फाटा येथे उड्डाण पूलासाठी सुमारे 229 कोटी रु. चा निधी केंद्रीय सडक परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडून मंजूरी मिळवली आहे.
मालेगाव शहाराजवळील चाळीसगांव चौफुली, टेहरे / सोयगांव फाटा व सवंदगांव फाटा येथे  वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात.तसेच या तिन्ही ठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी असते. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती.या भागातील नागरिकाची संसदरत्न खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे सातत्याने मागणी होती की या ठिकाणी उड्डाण पूल होणे गरजेचे आहे. संसदरत्न खासदार डॉ. सुभाष भामरे  यांनी नागरिकांची मागणी गांभीर्याने घेत  केंद्रीय सडक परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे व्यथा मांडली  व त्यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून या तिन्ही पूलांसाठी सुमारे 229 कोटी रु. निधी मंजूर करण्यात यश मिळविले आहे.
यामध्ये मलेगांव शहरलगत चाळीसगांव चौफुलीवर उड्डाण पूलासाठी 78.07 कोटी, टेहरे / सोयगांव येथील उड्डाण पूलासाठी 70.85 कोटी व सवंदगांव येथील उड्डाण पूलासाठी 80.08 कोटी रु. असे एकूण या तिन्ही उड्डाण पूलांसाठी 229 कोटी रु. चा निधी केंद्रीय सडक परिवहन मंत्री ना. नितिनजी गडकरी यांच्याकडून मंजूर करून आणला आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे हे गेल्या दोन वर्षापासून  केंद्रीय मंत्री ना. नितीन जी गडकरी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. व खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्याला यश मिळण्याचे समाधान व्यक्त होत आहे.यामुळे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी  केंद्रीय सडक परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे जाहीर आभार देखील मानले आहेत. तसेच या परिसरातील नागरिकांची मागणी पूर्ण होत असल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे. 

AVB माझा न्युज चॅनल सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध