Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ मार्च, २०२३

शिरपूर तालुक्यात टेकवाडे येथील विवाहित महिलेची आत्महत्या,पती सह परिवारावर गुन्हा दाखल



शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील विवाहित महिलेने आत्महत्या केल्याने सदर प्रकरणात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यात महिलेच्या पतीसह दीर सासू व सासरे यांच्या विरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याच्या आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील टेकवाडे येथे विवाहित महिलेने राहत्या घरात मुलाच्या झोळीच्या दोराने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. रोहीणी अतुल शिरसाठ, वय-27 रा.टेकवाडे ता.शिरपुर असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नावं आहे. 

याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वॉर्डबॉय नितेश गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरी नुसार सोमवार 27 मार्च रोजी सायंकाळी 6 साडे 6 वाजेच्या सुमारास अतुल राजु शिरसाठ याने राहत्या घराचा बंद दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडला नसल्याने घराचा दरवाजा तोडला असता घराच्या छताला बाळाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेतलेल्या स्थितीत रोहीणी शिरसाठ हीचा मृतदेह लटकलेल्या दिसून आला.तात्काळ खाजगी वाहनाने शांतीलाल भगवान शिरसाठ यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.दिव्या तवर यांनी रोहिणी शिरसाठ हिस तपासुन मयत घोषीत केले आहे.
 
या प्रकरणात मयत महिलेचे भाऊ रवींद्र हिलाल रामराजे वय 37 रा.अलखेड तालुका शहादा यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे रोहिणी शिरसाठ यांचे पती अतुल राजेंद्र शिरसाठ ,दीर राकेश शिरसाठ, सासू सुनंदा शिरसाट व सासरे राजेंद्र शिरसाठ यांच्याविरुद्ध रोहिणी शिरसाठ यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.आपल्या तक्रारीत त्यांनी मयत महिलेला सासरच्या लोकांनी आर्थिक मानसिक शारीरिक त्रास दिला असल्याचा आरोप देखील केला आहे. याबाबत पुढील सत्यता तपासण्यासाठी शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध