Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचा शहादा शहरात जन जागृती मोळावा... कार्यक्रमात पदाधिका-यांच्या नियुक्ती घोषणासह नियुक्ती पत्र देऊन केले सन्मानीत...
अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचा शहादा शहरात जन जागृती मोळावा... कार्यक्रमात पदाधिका-यांच्या नियुक्ती घोषणासह नियुक्ती पत्र देऊन केले सन्मानीत...
शहादा प्रतिनिधि:- अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था व शहादा भोई समाज पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने 26 मार्च 2023 रविवार रोजी नंदुरबार जिल्हातील शहादा शहरात भोई समाजाचा जन जागृती मेळावा घेण्यात आला.
भोई समाजाचे आराध्य दैवत संत भीमा भोई व स्वामी विवेकानंद आणि महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून जनजागृती मेळाव्यास सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथजी काटकर, तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य तथा सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम व लक्ष्मण हाके, प्रभारी पोलिस निरीक्षक राजनजी मोरे, राष्ट्रीय सचिव गजानन दादा साटोटे, राज्य अध्यक्ष तुकाराम वानखेडे,उपाध्यक्ष गणेश वानखडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत आपटे, , नाशिक विभागीय अध्यक्ष सी.एम. भोई,धुळे जिल्हाध्यक्ष भाईदास मोरे, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष सुपडू खेडकर, खान्देश भुषण एस.ए.भोई, धुळे जिल्हाध्यक्ष भाईदास मोरे, तर जेष्ठ समाजसेवाकांमध्ये सुखदेव मौरे, मंगला साठे,संजय साठे,संजय मोरे, विकमचंद शेवदे, अशोक वाडिले शामराव शिवदे, बाबूलाल वाडिले, धाकू मोरे, धनलाल शिवदे, गंगा मोरे, मोतीलाल भोई, धनराज वानखेडे, रमण ढोले,नंदुरबार जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडिले, कार्याध्यक्ष राजू तावडे, चंद्रवदन मोरे, चंद्रकांत वानखेडे,उमाकांत शिवदे नरेंद्र वाडिले,गुलाबराव सोनवणे उपस्थित
यावेळी चंद्रलाल मेश्राम म्हणाले की समाजाला दोष देण्यापेक्षा समाजात राहून संघटन वाढवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काम केले पाहिजे,नकारात्मक भूमिका घेऊन समाज संघटना किंवा संघटन होत नसते. समाजाने एकसंघ होऊन कुठलाही कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. समाज एकसंघ असला तर कुठलीही शक्ती आपल्या विरोधात जाऊ शकत नाही.असे सांगितले.राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरही भोई समाजाची परिस्थिती गंभीर होती.त्यामुळे आपल्याला आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे सांगितले.तर राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथजी काटकर यांनी समाजासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनाची थोडक्यात माहिती दिली.तर राज्य अध्यक्ष तुकाराम वानखेडे यांनी भोई समाजातील मच्छीमार बांधवांनसाठी किसान कार्ड व इतर मच्छीमार योजनाची थोडक्यात माहिती दिली.प्रास्ताविकात माजी नगरसेवक सुपड्डू खेडकर यांनी समाजाने दिलेल्या या सन्मानामुळे अत्यंत भावुकपणे त्यांना मिळेलेला सन्मान हा समस्त नंदुरबार जिल्ह्यातील भोई समाजाचा सन्मान असल्याचे सांगितले.नंदुरबार जिल्ह्यातील भोई समाजाच्या विविध उपक्रमांत महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याचे मोठे योगदान असून,त्यासाठी जिल्ह्यातील भोई समाजाने मला सहकार्य व सन्मान दिला आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन संजय भोई व शिरपूर येथिल प्रसिध्द कवी, लेखक व चित्रकार तथा विविध गौरव पुरस्कारांनी सन्मानीत आदर्श शिक्षक निकवाडे सर यांनी केले.
पदाधिका-यांच्या नियुक्ती घोषणासह नियुक्ती पत्र देऊन केले सन्मानीत
नाशिक विभागातील पदाधिक-यांच्या नियुक्तीसाठी नाशिक विभागातील नाशिक, जळगाव,धुळे व नंदुरबार हे जिलह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यास प्रत्यक्ष भेटून व त्याची मानसिकता जाणून घेऊन त्यास देण्यात येणा-या पदाची जबाबदारीची जाणीव करुन देण्यात आली. यासाठी विभागीय अध्यक्ष सी.एम.भोई व धुळे जिल्हा अध्यक्ष भाईदास भॊई यांनी जवळपास दोन ते तीन महिन्यापासून अथक परिश्रम घेऊन कार्यकारणी बांधणी करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील पदाधिकारी मिळवून दिलेत.ते पुढील प्रमाणे - या मेळाव्यात समाजाच्या नवनिर्वाचित पदाधिकायांचा सन्मान करण्यात आला, त्यात अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष सुपडू खेडकर शहादा, राष्ट्रीय सदस्य गुलाब भोई शिरपूर,राष्ट्रीय सदस्य सुभाष भोई शिरपूर, राष्ट्रीय सदस्य रामकृष्ण मोरे नंदुरबार,राष्ट्रीय सदस्य जयंतीलाल खेडकर शहादा, राष्ट्रीय सदस्य सुरेश शिवदे मालेगांव, राष्ट्रीय सदस्य कैलास ढोले मालेगांव, राष्ट्रीय सदस्य वंदना मोरे जळगांव, राज्य स्तरीय सदस्य संतोष भोई शिरपूर, राज्य स्तरीय सदस्य यशवंत निकवाडे सर शिरपूर,राज्य स्तरीय सदस्य तुकाराम रामोळे प्रकाशा, राज्य स्तरीय सदस्य अशोक शिवदे शहादा, राज्य स्तरीय सदस्य किशोर मोरे नांदगाव, राज्य स्तरीय सदस्य कृष्णा बावणे न्यायडोंगरी, राज्य स्तरीय सदस्य राजू मोरे भंडगांव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडिले खापर, नाशिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे नांदगाव, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापु मोरे दाभाडी, जळगांव जिल्हाध्यक्ष साहेबराव भोई जळगांव, जळगाव जिल्हाध्यक्ष ग्रामीण शामकांत मोरे भडगांव यांचा नियुक्तीची घोषणा करुन उपस्थित मान्यवराच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा