Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुका गट विकास अधिकारी जे टी सूर्यवंशी यांनी तब्बल 3500 सिंचन विहिरींना एकाच वेळी मंजुरी दिल्याबद्दल,साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघांकडून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला
साक्री तालुका गट विकास अधिकारी जे टी सूर्यवंशी यांनी तब्बल 3500 सिंचन विहिरींना एकाच वेळी मंजुरी दिल्याबद्दल,साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघांकडून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला
साक्री तालुक्याचे संवेदनशील व कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी साक्री पंचायत समिती चे सर्व प्रशासकीय कर्मचारी यांच्या सहकार्यने गेल्या पाच वर्षापासून स्थगित व प्रलंबित असलेल्या सिंचन विहीर प्रस्तावांना अखेर साक्री तालुक्याचे भूमिपुत्र तसेच साक्री पंचायत समितीचे प्रशासकीय गटविकास अधिकारी माननीय जे.टी. सूर्यवंशी साहेब यांचा अधिपत्याखाली अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.साक्री तालुक्यातील सर्व जाती धर्मांना विश्वासात घेऊन कुणावरही अन्याय न करता समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत कुठलाही घटक वंचित राहणार नाही याची काळजी घेत माननीय गटविकास अधिकारी यांनी त्यांचा कार्यालयातील यंत्रणेच्या मार्फत स्वच्छ आणि प्रामाणिक हेतूने आपल्या कामाची अंमलबजावणी केल्याचे अखेर दिसून आले आहे. आणि साक्री तालुक्यात विक्रमी म्हणजेच साक्री तालुका पंचायत समितीच्या इतिहासात कधी नव्हे एवढा तबबल साडेतीन हजार सिंचन विहिरींना एकाच वेळी मंजुरी देण्याचा विक्रम या माध्यमातून झालेला आहे वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून सूर्यवंशी साहेबांनी देखील या कामात स्वतः जातीने लक्ष घालून मोठे योगदान दिले आहे मात्र या निवड प्रक्रियेत कुठलाही दुजाभाव न करता सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना एकाच कक्षेत घेऊन थेट व्यक्तिगत लाभाच्या योजनामध्ये सामावून घेण्याचे उल्लेखनीय काम माननीय साहेबांनी केलेले आहे यामध्ये त्यांचे सर्व सहकारी यांचीही मोलाची मदत त्यांना लाभली आहे.त्यात प्रामुख्याने एक नाव घेता येईल ते म्हणजे रोहयो कक्षाचे सहाय्यक निरीक्षक *श्री.सुशील विधाते साहेब* यांचे साक्री तालुका पंचायत समितीमध्ये आज रोजी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे परंतु कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता थेट प्रामाणिकपणे प्रत्येक लाभार्थ्याला न्याय देण्याचे काम यानी आपल्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. अत्यंत निपक्षपातीपणे कुठलाही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता कुणाकडूनही एकाही रुपयाचे अमिष न बाळगता अत्यंत लोकहित उपयोगी काम करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सर्वच पक्षांकडून करण्यात आला आहे याचे सर्वप्रथम तालुक्याच्या वतीने स्वागत यामुळे साक्री पंचायत समितीतील सत्तेत असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे पदाधिकारी सन्माननीय सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य या सर्वांचेही मोलाचे योगदान आहे तसेच या सिंचन विहिरी व गाय गोठा मंजुरी प्रकरणात नेहमी आपली बाजू ठामपणे मांडणारे धडाडीचे पत्रकार श्री गिरीश नेरे,चंद्रशेखर अहिरराव,प्रवीण काकुस्ते, निलेश तोरवणे,अरुण अहिरराव, शेलार दादा,कैलास मोरे,प्रवीण बोरसे, तसेच सर्व पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते हे या विषयावर शर्तीचा पाठपुरावा व प्रयत्न करून अखेर तालुक्यातील सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे यावेळी साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब यांचे स्वागत व सत्कार (पत्रकार) चंद्रशेखर अहिरराव व प्रवीण काकुस्ते यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात करण्यात आला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा