Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील धाडणे गावच्या शेतकऱ्याचे जामखेडी पाठचाऱ्याच्या कामा संदर्भात लघु सिंचन व पाटबंधारे धुळे विभागाला निवेदन
साक्री तालुक्यातील धाडणे गावच्या शेतकऱ्याचे जामखेडी पाठचाऱ्याच्या कामा संदर्भात लघु सिंचन व पाटबंधारे धुळे विभागाला निवेदन
साक्री तालुक्यातील धाडणे येथील असंख्य तरुण शेतकरी मित्रांनी लघु सिंचन व पाटबंधारे विभाग धुळे यांचा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर हापसे साहेब यांना पाटचारी कामासंदर्भात निवेदन दिले आहे यामध्ये असे नमूद करण्यात आले आले आहे की गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून जामखेडी मध्यम प्रकल्पाचे पाठचारीचे काम झाले आहे.परंतु आजतागायत अनेक पाठचाऱ्या या अपूर्ण अवस्थेत आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि ज्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांना आज तागायत पाणी आलेले नाही त्यामुळे त्या जीर्ण झालेल्या आहेत संबंधित पाटबंधारे प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या निवेदनाची त्वरित दखल घेत यावर योग्य अंमलबजावणी करून लघु सिंचन व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून योग्य तो तोडगा काढावा व पाटचाऱ्यांचे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे व ज्या शेतकऱ्यांचा शेतातून पाठचारी गेल्या आहेत मात्र त्यानंतरही अनेक वर्षापासून त्यांना संबंधित प्राशासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही किंवा त्यांना शासन त्यांचा दारापर्यत आलेले नाही कुठलाही प्रकारचा दाखला त्यांना या माध्यमातून मिळालेला नाही आणि उर्वरित ज्या पाठचाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे तेथे मात्र अनेक वर्षापासून पाणी न आल्यामुळे त्या परत बंदिस्त व खराब होऊन गेल्या आहेत पाठ चाऱ्यांचे उर्वरित काम हे लवकरात लवकर मार्गी लावावे व शेतकऱ्यांना पाठ बागायतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.त्यावर लघु व पाटबंधारे सिंचन विभागाने लवकरच वरिष्ठ कार्यालयात संपर्क करून मार्ग काढावा अन्यथा पुढील काळात शेतकऱ्यांकडून उग्र व मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.यावेळी धाडणे गावातील प्रगतिशील शेतकरी कुणाल अहिरराव, राहुल अहिरराव,निखिल बोरसे,जितेंद्र अहिरराव, ललित अहिरराव आदी शेतकरी उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा