Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे अंतुर्ली गावाजवळील पुलासाठी 4 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर....
उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे अंतुर्ली गावाजवळील पुलासाठी 4 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर....
शिरपूर प्रतिनिधी :- उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली गावाजवळील लेंडी नाल्यावर पुलासाठी 4 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे.
शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन, उद्योगपती, युवा नेतृत्व तथा श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई चे उपाध्यक्ष, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली गावाजवळील लेंडी नाल्यावर पूल तयार करण्यासाठी आमदार अमरिशभाई पटेल यांच्याकडे पाठपुरावा केल्याने 4 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात 9 मार्च 2023 रोजी मंजूर झाला आहे.
उद्योगपती चिंतनभाई पटेल यांनी 9 सप्टेंबर 2022 रोजी अंतुर्ली गावाजवळ पुलाच्या समस्येबद्दल ग्रामस्थांशी चर्चा करून लवकरात लवकर पूल बनविण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनाची पूर्ती होत असल्याबद्दल अंतुर्ली व परिसरातील ग्रामस्थांनी चिंतनभाई पटेल यांच्यासह आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे आभार मानले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा