Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
वाघाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुकाध्यक्ष पुनमचंद भाऊ मोरे यांनी ९ मार्च मनसे पक्षाच्या १७ वा वर्धापन व दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती निमीत्ताने किर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन....
वाघाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुकाध्यक्ष पुनमचंद भाऊ मोरे यांनी ९ मार्च मनसे पक्षाच्या १७ वा वर्धापन व दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती निमीत्ताने किर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन....
शिरपूर प्रतिनिधी:- वाघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरा करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले होते.त्याप्रमाणे शिरपूर मनसे तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांच्या अथक परिश्रमातून तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या भरघोस प्रतिसादामुळे व त्यांच्या इच्छेनुसार वाघाडी येथे शिवजयंती उत्सव पुनमचंद मोरे यांनी मोठ्या थाटा माटात साजरी केली.यापुढे शिवजयंती तिथी प्रमाणे साजरा झाली पाहिजे असे सर्व महाराष्ट्र मराठी जनतेला व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना श्रीमान राज साहेब ठाकरे यांनी सुचविले होते.
शिरपूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी व शिवप्रेमींनी आपल्या घरावर भगवा झेंडा लावून रात्री घराच्या बाहेर शिव दीपोत्सव साजरा केला . तर वाघाडी येथे ग्रामीण जनतेच्या मनाचा वेद घेत,श्री छत्रपती शिवाजी महाराजाची महिती किर्तनातून त्यांच्या मनात उतरविण्यासाठी शिरपूर मनसे तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे यांनी ह.भ.प.मुकेश महाराज आंबाप्रिंरीकर यांच्या किर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.ह.भ.प. मुकेश महाराज आंबाप्रिंरीकर यांच्या मुखातून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेले संस्कार,छत्रपतींना आपण जाती - धर्मामध्ये वाटू नये अठरा पगड जाती ना घेऊन सोबत चालणारा हा जगातील एकच राजा होता,तो म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज.तसेच महाराजांच्या गमीनी कावा असे अनेक विविध विषयावर अनेक क्षणचित्र रंगविली.समोर बसलेला सर्व जन समुदाय,कार्यकर्ते व पदाधिकारी हे अतिशय शांतपणे ह्या कार्यक्रमाचा अस्वाद घेत होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन वाघाडी सरपंच श्री किशोर माळी व वाघाडी गावाचे तंटामुक्त अध्यक्ष श्रीराम आण्णा माळी,लेखक कवी श्री यशवंत निकवाडे सर,तरुण गर्जनाचे मुख्य संपादक संतोष भोई,यांच्या हस्ते करण्यात आला.दीप प्रज्वलन मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी,उपसरपंच जगदीश कोळी, शहराध्यक्ष चेतन राजपूत लोटन कोळी, यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मनसेचे निरीक्षक राज्य उपाध्यक्ष विनय जी भोईटे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच सदर कार्यक्रमास वाघाडी गावाचे सरपंच किशोर माळी,सुभाष नगरचे सरपंच विजय पवार, माजी सरपंच गोपाल दाभाडे,वाघाडी उपसरपंच जगदीश कोळी, विखरण गावाचे उपसरपंच कवरदास पाटील , तर वाघाडी ग्रामपंचायत सदस्य , विक्की मोरे,नम्रताताई ठाकूर, गायत्रीबाई,कोळी,राजेंद्र पाटील सुमनबाई भिल अर्जुन माळी, सीमाबाई, देशमुख,चंद्रकला रोकडे , गायत्री पि. कोळी , संदीप शिरसाट , मंगलबाई माळी , राजेश पवार , इंदुबाई चांभार, सलाम मनियार, मनसे जिल्हा अध्यक्ष राकेश चौधरी , शहराध्यक्ष चेतन राजपूत , मनविसे जिल्हा उपाध्यक्ष सोनू राजपूत ,किरण माळी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.तर विकी मोरे, विनोद कोळी,मयूर कोळी,गणेश मोरे,रोहित बागले,प्रशांत मोरे ,हिम्मत रोकडे,अजय सोनवणे , अमोल गुजर ,प्रवीण गुरव, शंकर कोळी इत्यादी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजक व आयोजक मनसे तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी केली असून सूत्र संचालन यशवंत निकवाडे सर यांनी केले . वाघाडी ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी पुनमचंद मोरे यांना यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडल्याने त्यांचे कौतुक केले आहे.
कार्यक्रमास उपस्थित मनसे पदाधिकारी अजय सोनवणे शिरपूर , वसंत कोळी हिसाळे,मनोज पाटील हिसाळे,अमोल गुजर,प्रवीण गुरव , सुनील जाधव,अजय सोनवणे ,व अधिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य म्हणून श्रीराम भजनी मंडळ वाघाडी यांचे सहकार्य लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा