Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
शेणपुर येथे शॉर्टसर्किटमुळे मक्याच्या चाऱ्याला भीषण आग सुमारे 500 क्विंटल मक्याचा चारा व गुरांचा गोठा जळून खाक
शेणपुर येथे शॉर्टसर्किटमुळे मक्याच्या चाऱ्याला भीषण आग सुमारे 500 क्विंटल मक्याचा चारा व गुरांचा गोठा जळून खाक
आज दि.03/03/ 2023 वार शुक्रवार रोजी मौजे शेनपूर येथे श्री निखिल शरद काळे मु.पो. शेनपुर यांच्या शेतातील गट न. 441/1 मध्ये मक्याच्या चाऱ्याला विद्युत वाहिनीच्या तारा लोमकळल्या असल्याने पार्किंग होऊन आगीचे गोळे पडल्याने सुमारे 500 क्विंटल मक्याच्या चाऱ्याची गंजी जळून खाक झाली आहे.आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे तेथील स्थानिक शेतमजुरांनी सांगितले. त्यानंतर गावातील सुमारे 30 ते 40 लोक घटनास्थळी पोहोचले त्यानंतर रात्री उशिरापर्यंत म्हणजेच साडेसात ते साडेआठ वाजे पर्यत गावकऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. तेथील शेती पंपाची लाईट सुरू असल्यामुळे विहिरीच्या पाण्याद्वारे पाईपलाईनने आग विझवणे मदत झाली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी असलेल्या जवळच एक शेडमध्ये काही जनावरे बांधलेली होती. मात्र प्रसंग अवधान राखून ही जनावरे तिथून काढण्यात आली. व शेडही जाळून खाक झाले आणि त्यानंतर तेथील काही अंतरावरच कांदा चाळ असल्याने तेथेही सुमारे 30 क्विंटल कापूस ठेवलेला होता परंतु गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने तेथे पर्यंत आग पोहोचू दिली नाही.आग एवढी भीषण होती की गावातील 50 युवकांना देखील आगीवर नियंत्रण आणणे कठीण झाले होते. ही आग लागण्याचे मुख्य कारण म्हणजे विद्युत प्रवाहाच्या लोम कळणाऱ्या तारा म्हणजेच महावितरण चा गलिच्छ आणि भोंगळ कारभारामुळे एका सामान्य शेतकऱ्याचे सुमारे 500 क्विंटल मक्याचा चारा ऐन उन्हाळ्यात जुळून खाक झाला आहे.उन्हाळ्यातील चाऱ्याचे महत्व एका शेतकऱ्यापेक्षा दुसरे कुणालाही कळणार नाही.मात्र हाता तोंडापाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम महावितरणाच्या चुकीच्या कामकाजामुळे झाले आहे.असे संबंधित शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. महसूल व विद्युत विभागाने संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून शक्य तेवढा योग्य मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याला समाधान मिळेल.ऐन उन्हाळ्यात त्याला त्याची गुरेगुरे पोहोचण्यासाठी काहीतरी आर्थिक मदतीची तरतूद शासनाकडून करावी हीच माफेक अपेक्षा व घटनास्थळी परिसरातील लोणकरणाऱ्या तारा,वेडेवाकडे विद्युत पोल, जळालेल्या केबल,या सर्व वस्तूंचा पुरवठा महावितरणने करून तेथे भविष्यात होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेला आळा घालावा असे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे.यावेळी घटनास्थळी शेणपुर सरपंच चंद्रकांत काळे उपसरपंच दादाजी थोरात तसेच सदस्य प्रतिनिधी नंदकुमार काकूंस्ते,आकाश काकुस्ते, पृथ्वीराज काकुस्ते, व ग्रामसेवक निकम,तलाठी जाधव आप्पा, कोतवाल मोहिते,पोलीस पाटील हेमराज काळे, गावातील तरुण मंडळी,सामाजिक कार्यकर्ते,सुनील काळे चंद्रशेखर अहिरराव प्रवीण काकुस्ते कनिष्ठ अभियंता राऊत साहेब,पाटील साहेब,लाईनमन बाविस्कर व त्यांचे चार कर्मचारी,सहाय्यक,आदी उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा