Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश कार्यकारिणी मध्ये निवड व नियुक्ती बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा...



भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश च्या महिला प्रदेश अध्यक्षा सौ. अल्काताई अनिलजी घाटे मुंबई यांच्या भोई समाजाच्या सामाजिक कार्याची, तसेच लोक कलावंत तथा संगीत व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची व महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती संघर्ष समिती च्या महिला प्रदेश अध्यक्षा या पदावर कार्यरत असताना केलेल्या मच्छीमारांच्या विकास कार्याची दखल घेत,आता महाराष्ट्रातील समस्त भटके विमुक्त समाजाला संघटीत करून त्यांचा विकास व्हावा या दृष्टीने ताईंना सत्ताधारी राजकीय पक्षाच्या भटके विमुक्त आघाडी च्या माध्यमातून आपल्या राजकीय कार्याची वाटचाल सुरू करण्याच्यादृष्टीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड व्हावी. ही आम्हा समाज बांधवांसाठी अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे.


भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत विविध सामाजिक घटकांचा विकास व्हावा या उद्देशाने अनेक आघाड्यांचे माध्यमातून विकास कार्य सुरू आहे.त्यापैकी एक म्हणजे भटके विमुक्त समाजाच्या विकासासाठी भाजप भटके विमुक्त आघाडी कार्यरत आहे.

भटके विमुक्त आघाडी प्रदेश कार्यकारिणी चे मुख्य संयोजक तथा माजी आमदार श्री.नरेंद्रजी पवार साहेब व महिला आघाडी मुख्य संयोजक डॉ. सौ.उज्वलाताई हाके यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाचा कारभार सुरू असताना, भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश च्या महिला प्रदेश अध्यक्षा सौ.अल्काताई अनिलजी घाटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ताईंची भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडी महिला प्रदेश कार्यकारिणी मध्ये प्रदेश सचिव म्हणून आज कल्याण येथील भटके विमुक्त आघाडी चे प्रदेशाचे मुख्य संयोजक श्री नरेंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते त्यांचा कार्यालयात सौ. अल्काताई घाटे यांना नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.

भटके विमुक्त आघाडी प्रदेश कार्यकारिणी च्या महिला प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल, सौ. अल्काताई अनिलजी घाटे यांचे मनापासून अभिनंदन व आपल्या राजकीय क्षेत्रातील कार्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...


शुभेच्छुक:-

राहुल चंद्रभानजी हरसुले
संघठन मंत्री,भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश, तथा
शहराध्यक्ष,भाजप भटके विमुक्त आघाडी यवतमाळ.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध