Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ मार्च, २०२३

धुळे पोलिसांची दमदार कारवाई तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांचा गुटखा जप्त पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीत केली कारवाई पोलीस जोमात गुटखा तस्कर कोमात



धुळे शहरांमध्ये विविध समस्या समोर येत असताना दुसरीकडे धुळे शहर पोलिसांनी तब्बल एक कोटी 23 लाख रुपयांचा गुटखा जप्त केल्याने धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या निमडाळे गाव शिवारात ही कारवाई केली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा मोठ्या प्रमाणावर वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच ऋषिकेश रेड्डी आणि पथकाने या ठिकाणी सापळा रचत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
 माननीय ऋषिकेश रेड्डी - सहाय्यक पोलीस अधीक्षक - धुळे 
पहाटे तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे. शहरात गुटखा तस्करी वाळूमाफिया किंवा कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्यास पोलिसांना याबाबत माहिती द्यावी अस आवाहन पोलिसांकडून करण्यात आलिय तर पोलिसांनी केलेल्या या दमदार कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. 


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध