Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुका भाजप विधानसभा क्षेत्राचे बूथ सशक्तीकरण व आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूकी संदर्भात चर्चा सत्र
साक्री तालुका भाजप विधानसभा क्षेत्राचे बूथ सशक्तीकरण व आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूकी संदर्भात चर्चा सत्र
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने महाविजय २०२४अभियान जाहीर केले असून साक्री विधानसभा मतदारसंघ वर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार आज भारतीय जनता पार्टीने साक्री विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग नवडणे ता साक्री येथील भुषण रविंद्र ठाकरे मंडळ उपाध्यक्ष यांच्या मळ्यात संपन्न झाला या प्रशिक्षण वर्गास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी माजी जिल्हाध्यक्ष संभाजी बापु पगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी साक्री तालुक्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा देवुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत आगामी काळात बुथ सशक्तीकरण संदर्भात माहिती देवुन कार्यकर्तांना इंजि मोहन सुर्यवंशी यांनी संबोधित केले तसेच संघटन सरचिटणीस डी एस गिरासे सर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी व जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहचतील याचे मार्गदर्शन केले बुलंद तोफ सरचिटणीस शैलेंद्र आजगे यांनी येणाऱ्या काळात विधानसभा मतदारसंघांत भाजपाचाच झेंडा फडकवुन इंजि मोहन सुर्यवंशी यांना विधानसभेवर पाठवण्याचा संकल्प केला तर बुथ सशक्तीकरण अभियानांतर्गत बुथ अध्यक्ष शक्तिकेंद्र प्रमुख विस्तारक बुथ स्तरावर संघटनात्मक कार्य कशा पध्दतीने करावे या संदर्भात माजी जिल्हा ध्यक्ष संभाजी बापु पगारे व सरचिटणीस भाऊसाहेब देसले यांनी मार्गदर्शन केले आगामी काळातील सर्व निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्तानी कामाला लागा अशा सुचना प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड सुरेश शेवाळे यांनी केले प्रशिक्षण वर्गास बुथ अध्यक्ष शक्तिकेंद्र प्रमुख भाजपा जिल्हा पदाधिकारी मंडळ पदाधिकारी जि प सदस्य प स सदस्य नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते "विजय ही विकल्प है संघटन का संकल्प है"
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर आहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा