Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळेचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली साक्री तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी* *प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश
धुळेचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली साक्री तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी* *प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश
धुळे, दि. 7 : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी साक्री तालुक्यातील टिटाणे, खोरी, पेटले, दुसाणे या भागात जाऊन पाहणी केली.
साक्री तालुक्यातील काही भागात सोमवारी अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. महाजन यांनी आज या भागाचा दौरा केला. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीनाताई गावित, आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. डी. मालपुरे, तहसीलदार श्री. चव्हाणके
यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. महाजन यांनी अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा