Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ मार्च, २०२३

शासनाने आर्थिक आपत्ती मंडळ स्थापन करावे - पोपट राव सोनवणे....साक्री तालुक्यातील गारपीट ग्रस्त खोरी टीटाने भागाची राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडून पाहणी.....!!



धुळे - नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका साक्री तालुक्यातील खोरी ठिठाणे या भागाला बसला आहे. या भागातील उभे पिक आडवे झाल्याने शेतकरी राजाचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी राजा मोठा हवाल दिल झाला आहे. याच नुकसान ग्रस्त भागाचा दौरा राष्ट्रवादी च्या पदाधिकार्यांनी करुन शेतकऱ्यांना दिलासा देत शासना कडे पाठपुरावा करुन मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतकरी राजाचे नुकसान होते. शासनाच्या वतीने हजारो कोटींची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना दिले जाते. मात्र यातील 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांनाच या नुकसान भरपाईचा लाभ मिळत असल्याने शासनाने आर्थिक आपत्ती मंडळ स्थापन करून बजेटमध्ये याची तरतूद करून शेतकऱ्यांच्या पिक विमा ची रक्कम या मंडळात टाकून सॅटलाईटच्या माध्यमातून सर्वे करून शासनाला नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सोयीस्कर होईल . त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक आपत्ती महामंडळ स्थापन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते पोपटराव सोनवणे यांनी शासनाकडे केली आहे. पालकमंत्र्यानी केवळ धावती भेट देत मोजक्याच गावांचे पाहणी केली. मात्र ज्या गावात सर्वात जास्त नुकसान झाले आहे . त्या भागात पालकमंत्री फिरकले सुद्धा नाही. असा आरोप देखील सोनवणे यांनी आरोप केला आहे. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अशी मागणी सोनवणे यांनी शासनासह प्रशासनाकडे केली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते पोपटराव सोनवणे, विजय वाघ, अविनाश लोकरे यांच्या सह पदाधिकारी व स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध