Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना...अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पंधराशे रुपये मानधनवाढीला विरोध दि.९ मार्चला अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर पुन्हा धडकणार
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना...अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पंधराशे रुपये मानधनवाढीला विरोध दि.९ मार्चला अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर पुन्हा धडकणार
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनात भरीव वाढ करावी आणि अन्य मागण्या शासनाने सोडवाव्यात यासाठी दि.२३ फेब्रुवारी पासून राज्यभर असहकार आंदोलन सुरू केले आहे.
त्याअनुषंगाने शासनाने दोन दिवसांपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १५०० वाढ केल्याची घोषणा केली.महागाईचा विचार करता जाहीर केलेली मानधनवाढ तुटपुंजी आहे.
म्हणून या तुटपुंज्या मानधनवाढीला विरोध करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दि.२ मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे मायाताई परमेश्वर,रामकृष्ण पाटील आणि युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वाखालील धरणे आंदोलन केले.धरणे आंदोलनात राज्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आमदार कुणाल बाबा पाटील (धुळे), आमदार आमश्या पाडवी(अक्कलकुवा) यांनी आझाद मैदानावर येऊन पाठिंबा देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह अन्य मागण्यांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली जाईल.असे जाहीरपणे सांगितले.
विधानसभेत आमदार कुणाल बाबा पाटील,आमदार आमश्या पाडवी,आमदार जयंत पाटील,आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा मुद्दा जोरदारपणे मांडत सभात्याग केला. याबद्दल संघटनेने सर्व आमदारांचे आभार मानले आहेत.
पंधराशे रुपयांऐवजी भरीव स्वरूपाची मानधनवाढ करावी.यासाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी दि.९ मार्च रोजी पुन्हा आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत.सदर मोर्चात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भागिदारी करावी असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा