Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
पक्ष चोरला,नाव चोरलं पण जीवाभावाची माणसं आजही सोबत - ठाकरे.....!! जिकें पर्यंत लढणार उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत व्यक्त केला निर्धार....
पक्ष चोरला,नाव चोरलं पण जीवाभावाची माणसं आजही सोबत - ठाकरे.....!! जिकें पर्यंत लढणार उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत व्यक्त केला निर्धार....
पक्षाचे नाव चोरले, चिन्ह चोरले, हातात काहीच राहीले नाही. तरीही मालेगावात एवढी प्रचंड गर्दी सभेला झाली. हेच माझे बळ आहे. त्यामुळे आता जिंकेपर्यंत लढायचं हा एकच निर्धार आहे असा आत्मविश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मालेगावातील कॉलेज मैदानावर जनसमुदायासमोर बोलताना व्यक्त केला. ह्याच निर्धाराने शिवसेना पुढे जाणार आहे. एवढ्या गर्दीने जनता सभेला येणे असे प्रेम गद्दारांच्या नशिबात नाही असेही ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले भाषण वाचता येते. मात्र रतनकाका या शेतकरीने रक्ताने लिहीलेले पत्र वाचता येत नाही का? नैसर्गिक संकटे, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतकरीवर्गाला तत्परतेने मदत आता मिळते का ? वस्त्रोद्योगासाठी हे सरकार काय करत आहे? असे अनेक प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले. गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही. जिथे जिथे जाल तिथे तिथे त्यांची गद्दार म्हणूनच अवहेलना होत आहे. माझा पक्ष शिवसेना आहे. म्हणून मी शिवसेनाच म्हणेल. कारण शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली आहे.मिंध्यांच्या बापाने नाही असा घणाघातही ठाकरेंनी केला. गद्दारांना बावनकुळे चाळीसच जागा देणार असे म्हणाले. त्यांनी बोलताना कुळाचा तरी विचार करायला हवा होता. निदान त्यांना बावन्न देण्याची तरी तयारी दाखवा. भाजपने भ्रष्टाचार संपवायचे ठरवले आहे. म्हणून भ्रष्टांना पक्षात घेवून त्यांना स्वच्छतेचे प्रमाणपत्र देतात. अशा प्रकारे सर्व भ्रष्टाचार संपवणार असाल तर भाजपाने आपल्या पक्षाचे नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी करावे. कारण भारतीय जनता ध्रष्ट नाही. त्यामुळे भारतीय जनतेच्या नावाने पक्ष चालवू नका अशीही टीका ठाकरेंनी केली. मी कॉग्रेससोबत गेलो म्हणून मी हिंदुत्व सोडल्याच्या विरोधकांनी आरोळ्या ठौकल्या. मी पुन्हा सांगतो मी हिंदुत्व सोडलेले नाही. पण मला शेंडी जाणव्याचे हिंदुत्व मान्य नाही अशीही भूमिका ठाकरेंनी मांडली.
राहूल गांधीना आव्हान - देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत मात्र राहुल गांधींना जाहीरपणे सांगतोय सावरकर आमचं दैवत असून त्यांचा अपमान कधीही सहन करणार नाही असा आव्हान देखील ठाकरे यांनी गांधी यांना केल आहे.
भाजपावर जहरी टीका - 2024 च्या निवडणुकीत जर तुम्ही भाजपाला सत्तेवर बसवलं तर तर या देशात यापुढे निवडणुका होणार नाहीं देश हा हुकूम शेकडे वाटचाल करेल . त्यामुळे वेळ चुकली तर हुकूमशाही होणारच असं त्यांनी जनतेला आव्हान करत भाजपवर जहरी टीका केली आहे. अनिल देशमुख यांचे पाच वर्षाचे नात व लालूप्रसाद यादव यांची गर्भवती सून हे बेशुद्ध होईपर्यंत तपास यंत्रणा चौकशी करते ? हेच का तुमचे हिंदुत्व ? यांच्या नेत्यावर टीका केली म्हणजे भारताचा अपमान होतो का ? आमच्या कुटुंबाला बदनाम करणं थांबवलं नाही तर तुमच्या कुटुंबाचे देखील कुठे लागेबांधे आहे हे उघड करायला वेळ लागणार नाही. मात्र घरापर्यंत जाणार हे आमचे हिंदुत्व नाही असं म्हणत भाजपावर सडकून टीका केली आहे.
याप्रसंगी रश्मी ठाकरे , युवा सेना सचिव वरून सरदेसाई, अद्वय हिरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार आमशा पाडवी, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर-तालुक्य...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा