Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ मार्च, २०२३

साक्री तालुक्यातील वासखेडी येथे समाज सेवक डॉ.राकेश साळुंके यांचा कडून जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप कार्यक्रम संपन्न



धुळे जिल्हा परिषद शाळा वासखेडी येथे माता पालक मेळावा घेण्यात आला डॉक्टर राकेश गोरख साळुंखे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले दप्तरामध्ये शैक्षणिक साहित्य वही पेन कंपास प्लास्टिक मुक्त पिशवी पेन्सिल विविध साहित्य होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोरख नथ्थू पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम होत्या मॅडम यांनी प्लास्टिक मुक्त विषयी सखोल अशी माहिती सांगितली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक कुंवर भैय्यासाहेब दहीते शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य उपस्थित होते कैलासवासी सुमनबाई बाबुराव कुवर यांच्या स्मरणार्थ मीनाक्षी बाबुराव पाटील यांनी इयत्ता चौथीची हुशार विद्यार्थीनीं चेतना जगताप ला बक्षीस देण्यात आले. मुख्याध्यापक संगीता पाटील मॅडम यांनी यांनी प्रस्तावना केली व डॉक्टर राकेश साळुंखे यांचे आभार मानले. संगीता साळुंखे मॅडम यांनी फलक लेखन केले श्री केवबा बच्छाव यांनी सुत्र संचालन केले . व निपुण भारत अंतर्गत आयडिया व्हिडिओ संदर्भात माता पालक यांना मार्गदर्शन केले श्री सुभाष पगारे सर यांनी शेवटी आभार मानले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध